शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रात्री तीन वाजता केला दुकानावर अवैधरीत्या कब्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:34 IST

संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर आता हळूहळू संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असल्याचे प्रत्यंतर बुधवारी रात्री आले आहे.  

ठळक मुद्देतक्रार देऊनही कारवाई नाही अकोल्यात संघटित गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर आता हळूहळू संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असल्याचे प्रत्यंतर बुधवारी रात्री आले आहे.  सदैव गजबजलेल्या  मोहंमद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन दुकानाचे कुलूप तोडून अनधिकृतरीत्या दुकानाचा ताबा घेतला. हा प्रकार हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि अतिसंवेदनशील भागातील ताजनापेठ पोलीस चौकीजवळ घडल्यावरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एवढेच नाही, तर गुंडांनी रात्री ३ वाजताच्या सुमारास विद्युत डीपीवरून मोहंमद अली रोड परिसराचा विद्युत पुरवठा खंडित केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.  दीपक चौकात राहणारे अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहंमद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. त्यांनी अब्दुल हबीब यांच्या वडिलांना व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमले होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अब्दुल हबीब हे दुकानाचे काम सांभाळतात. या दुकानाबाबत अब्दुल हबीब यांचे व मूळ भाडेकरी व दुकान मालकाचा आपसात दिवाणी न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खटला सुरू आहे. दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, मालकाने हे दुकान काही लोकांना विकले. मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्‍या व्यक्तीने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडले आणि अनधिकृतपणे  दुकानाचा ताबा घेतला व दुकानातील साहित्य बाहेर फेकून दिले आणि हातात शस्त्र घेऊन हे गुंड त्यांची दुकानात येण्याची वाट पाहत होते, असा आरोप त्यांनी केला. मोहंमद अली रोड हा अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. अब्दुल हबीब यांच्या दुकानापासून अगदी हाकेच्या अंतरावर ताजनापेठ पोलीस चौकी आहे. संघटित गुंडांनी बुधवारी रात्री हातात शस्त्र घेऊन दुकानाचे कुलूप तोडले. अतिसंवेदनशील भागात गुंड हैदोस घालीत असताना पोलिसांच्या कानावर हा प्रकार कसा गेला नाही, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या घटनेवरून खुलेआम गुंडगिरी करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असल्याचे दिसून येते. पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील गुंडगिरी फोफावल्याचे हे उदाहरण आहे. 

विद्युत पुरवठाही केला खंडितसंघटित गुन्हेगारी आणि हातात शस्त्र घेऊन घातलेला हैदोस परिसरातील सीसी कॅमेर्‍यांमध्ये टिपल्या जाऊ नये, या उद्देशाने गुंडांनी रात्री ३ वाजता डीपीवरून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गैरअर्जदाराच्या बाजूने मार्च महिन्यात न्यायालयाने निर्णय देत, दुकानाचा ताबा देण्याचे आदेश दिले. त्याने आमच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रतही सादर केली. झालेल्या बैठकीत अर्जदाराने गैरअर्जदाराला दुकानाचा ताबाही दिला. शस्त्र घेऊन कोणीही आले नाही, आम्ही चौकशी केली आहे. - अनिल जुमळे, ठाणेदार, कोतवाली पोलीस स्टेशन.

गैरअर्जदाराला दुकानाचा ताबा दिलेला नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातात शस्त्रे घेऊन आलेल्या गुंडांनी दुकानाचे कुलूप तोडून ताबा घेतला. याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात केली; परंतु पोलिसांनी गुंडांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.  - अब्दुल हबीब, तक्रारकर्ता

टॅग्स :Crimeगुन्हा