पोषण आहारावर आता समीक्षा पथकाची नजर!
By Admin | Updated: September 27, 2014 00:08 IST2014-09-27T00:08:02+5:302014-09-27T00:08:02+5:30
पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन.

पोषण आहारावर आता समीक्षा पथकाची नजर!
बुलडाणा: शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे, राज्य शासनाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन केले आहे.
शाळांमधील आहाराची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम राज्य समीक्षा पथक करणार आहे. त पासणीमुळे पोषण आहार योजनेतील काळाबाजार बंद होऊन, पोषण आहार गरजू विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांना वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार ठरवून देण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना पुरवठा विभागामार्फत तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या कंत्राटदारांमार्फत अन्य साहित्य पुरवले जाते. दुर्दैवाने शाळांमधून विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार्या आहारामध्ये सातत्य नाही, तसेच पुरविल्या जात असलेला तांदूळ आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात होत असतात.
आहार आवश्यक त्या प्रमाणात शिजवला जात नाही आणि तो गरजू विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचत नाही, असे शासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्याची दखल घेऊन, राज्य शासनाने आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन केले आहे. या प थकामार्फत शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्या त येणार आहे. हे पथक अंमलबजावणीची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना सुचविणारा अहवाल शासनाला सादर करणार आहे. या तपासणीतून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात सदर योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात नाही, हे समोर येणार आहे.