शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

परिचारिकांनी पुकारले दोन दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 8:05 PM

The nurses called for a two-day statewide strike : विविध मागण्यांसाठी बुध‌वारपासून (दि. २३) दोनदिवसीय पूर्णवेळ कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा इशारा

अकोला : कायमस्वरूपी पदभरती, अतिरिक्त खाटांसाठी नव्याने पदनिर्मिती, परिसेविका, अधिसेविका, पाठ्यनिर्देशिकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावी. राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी बुध‌वारपासून (दि. २३) दोनदिवसीय पूर्णवेळ कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास शुक्रवारपासून (दि. २५) राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ ते २५ जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संघटनेच्या अकोला शाखेतर्फे बुध‌वारी (दि. २३) सर्वोपचार रुग्णालय परिसरात निदर्शने करण्यात आली. यापूर्वी २१ व २२ जून रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे राज्यभरात दोन तासांचे कामबंद आंदाेलन केले होते; मात्र शासनातर्फे कुठलेही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. त्यामुळे २३ आणि २४ जूनदरम्यान राज्यभरातील परिचारिका पूर्णवेळ कामबंद ठेवणार आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे. या दोन दिवसातही प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास २५ जूनपासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ करण्याचा इशाराही यावेळी परिचारिकांनी दिला. आंदोलनात अध्यक्ष वंदना डामरे, सरचिटणीस सतीश कुरटवाड, उपाध्यक्ष प्रकाश नवरखेडे, सहसरचिटणीस सुमेध वानखडे, कोषाध्यक्ष मनोज चोपडे, सहकोषाध्यक्ष जया खांबलकर, संघटक स्वप्निल लामतुरे, प्रमोद चिंचे, सदस्य सुनीता उगले, लता गोहत्रे, संध्या उमाळे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

 

..या आहेत मागण्या

कोविडकाळात सात दिवस कर्तव्यकाळ व तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवा. बंद केलेली साप्ताहिक सुटी द्या.

केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांच्या पदनामात बदल करावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासनमान्यता प्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातो, तो थांबवावा.

कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेला कालावधी व विश्रांतीचा कालावधी गैरहजेरी किंवा वैद्यकीय रजा न पकडता, कोविड विशेष रजा पकडून विलंब वेतन अदा करावे.

परिचारिकांना फक्त रुग्णसेवेची कामे द्यावी, मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब ५० लाख विमा व इतर सर्व देय आर्थिक लाभ द्यावे.

मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने नोकरी द्यावी.

रुग्णसेवा प्रभावित; कंत्राटींवर जीएमसीचा भार

परिचारिकांनी राज्यव्यापी पुकारलेल्या आंदोलनामुळे अकोल्यासह राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील सुमारे ३० ते ४० टक्के रुग्णसेवा प्रभावित झाल्याची माहिती आहे. येथील रुग्णसेवेचा भार हा कंत्राटी परिचारिकांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचीही माहिती आहे.

 

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही रुग्णसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली आहे, मात्र सर्जरीसह इतर महत्त्वाचे वाॅर्ड सुरळीत सुरू आहेत.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय