रुग्णसंख्या घसरली; अकोलेकरांनो गाफील राहू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST2021-05-21T04:19:59+5:302021-05-21T04:19:59+5:30

अकाेला : मागील आठ दिवसांच्या कालावधीत शहरात काेराेनाबाधितांच्या संख्येत किंचित घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे़ गुरुवारी जिल्हा ...

The number of patients dropped; Don't be indifferent, Akolekars! | रुग्णसंख्या घसरली; अकोलेकरांनो गाफील राहू नका!

रुग्णसंख्या घसरली; अकोलेकरांनो गाफील राहू नका!

अकाेला : मागील आठ दिवसांच्या कालावधीत शहरात काेराेनाबाधितांच्या संख्येत किंचित घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे़ गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील १६२ जणांना काेराेनाची लागण झाली आहे़ काेराेना बाधितांचा घसरलेला आकडा पाहता अकाेलेकरांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी गाफील राहू नये, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यासह शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाने हाहाकार घातला आहे़ मनपा क्षेत्रात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासनाचे प्रयत्न तोकडे ठरले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यापासून ते प्रभावी उपाययाेजना राबविण्यात प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरली आहे. दुसरीकडे नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळेच मागील अडीच महिन्यांपासून शहरात दरराेज किमान अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक जणांना काेराेनाची बाधा हाेत असल्याचे अहवालाअंती दिसून येत होते. यामध्ये ज्यांनी काेराेनाची चाचणी केलीच नाही, अशा बाधितांची मनपाच्या दप्तरी नाेंदच नाही़ त्यामुळे काेराेनाबाधितांचा वाढता आकडा पाहता शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा फैलाव झाल्याची परिस्थिती आहे़ अशा परिस्थितीत गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालात प्रथमच काेराेनाबाधितांच्या संख्येत घसरण आल्याचे दिसून आले़

पश्चिम झाेनमध्ये संख्या वाढली!

शहरात दरराेज अडीचशे किंवा तीनशे रुग्ण आढळून येत असतील तर त्यामध्ये प्रत्येकी शंभर रुग्ण हे पूर्व व दक्षिण झाेनमधील असल्याचे चित्र होते. मागील काही दिवसांपासून या दोन्ही झोनमधील संख्या कमी झाली असली तरी आता पाचिम झोनमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात पूर्व झाेनमध्ये ४५ रुग्ण आढळून आले़ तसेच पश्चिम झाेनमध्ये ४४ , उत्तर झाेनमध्ये १७ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे ५६ रुग्ण आढळून आले आहेत़

Web Title: The number of patients dropped; Don't be indifferent, Akolekars!