अकोल्यात वाढतेय समलिंगींची संख्या!
By Admin | Updated: August 3, 2016 01:41 IST2016-08-03T01:41:57+5:302016-08-03T01:41:57+5:30
धक्कादायक वास्तव : १४ ते १५ वर्षांच्या मुलांचाही समावेश.

अकोल्यात वाढतेय समलिंगींची संख्या!
अकोला: 'समलिंगी'हा शब्द ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावतात. तोंडाला कुलूप, पण डोक्यात अनेक प्रश्नांचा भुंगा घेऊन समाजात वावरणार्या लोकांची संख्या कमी नाही. एखाद्या निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार उभा राहिला, की तो सेलिब्रिटी होतो, त्यांच्यामधीलच एखादी लक्ष्मी त्रिपाठी जगभराच्या व्यासपीठावर व्याख्याने देत कौतुकाने मिरविते. मात्र, समलिंगीबद्दल समाजात अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. सध्याच्या काळात 'सेक्स' हा विषय चोरून बोलण्याचा राहिला नाही. शाळांमध्येही लैंगिक शिक्षण दिले पाहिजे का? या विषयी सरकार दरबारीही अनेकदा चर्चा घडल्य. त्यामुळे 'समलिंगी'चे जग कसे आहे, हे वास्तव 'लोकमत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अकोल्यातील चित्र धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. अकोल्यातील समलिंगींची संख्या ही वाढतीच असून, पंधरा वर्ष वयोगटातील कोवळी मुलेही यामध्ये असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
अकोला शहरातील बसस्थानकाचा मुत्रीघर परिसर, गांधी-नेहरू बाग, नेहरू पार्कच्या कुंपण भिंतीचा परिसर, उदय टॉकीजजवळ, आकोट फैलजवळ अशी अनेक ठिकाणं समलिंगींचा अड्डा बनली आहेत. शहरासह जिल्हाभरात तब्बल तीन हजारांपर्यंत समलिंगी लोकांची ह्यसाखळीह्ण बनली आहे. यापैकी ६१५, तर नियमित समुपदेशन घेत असल्याची अधिकृत माहिती आहे.
या समलिंगीमध्ये महाविद्यालयात शिकणार्या तरुणांपासून तर थेट चाळिसीच्या पार झालेल्यांचाही समावेश आहे. यांच्यामधीलच एकाला समलिंगीच्या विश्वाबाबत बोलते केले असता, त्याने सध्या तारुण्याच्या उंबरठय़ावर आलेल्यांची समलिंगीमध्ये भर पडत असल्याचे सांगितले.
हे गृहस्थ सध्या ४५ च्या घरात आहेत. अजाणत्या वयामध्येच मी यामध्ये गोवल्या गेलो व आता सवय झाली. घरी संसार आहे, मुले मोठी झाली, पण सवय कायम असल्याचे ते म्हणाले. आम्ही पुरुषच आहोत, पौरुष कुठेही कमी नाही, तुम्हाला सांगितले म्हणून कळले तरी कोणाला शंकाही येत नाही.
ह्यअनैसर्गिकह्ण म्हणून शिकलेली मंडळी आमच्यावर टीका करतात, पण आमच्यासाठी काहीही अनैसर्गिक नाही आमची भूक आम्ही भागवतो, अशा शब्दात त्यांनी पांढरपेशा मानसिकतेवर ताशेरे ओढले.
*समलिंगीमध्ये ही आहेत तीन प्रकार
समलिंगी संबंध ठेवणार्या व्यक्तीच्या वर्तनावरून त्यांचे कोती, पंथी व डबलडेकर असे तीन प्रकार पाडले आहेत.अकोल्यात कोतीचे प्रमाण हे वाढते आहे.
कोती म्हणजे संबंधामध्ये जो पुरूषाच्या भूमिकेत असतो.
पंथी म्हणजे जो स्त्रीच्या भूमिकेत राहतो.
डबलडेकर म्हणजे जो दोन्ही भूमिकेत असतो.