शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ९८ हजारांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:37 IST

गतवर्षी २ लाख ९६ हजार १२५ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९८ हजारांहून अधिक प्रमाणात घटली आहे. गतवर्षी २ लाख ९६ हजार १२५ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते, तर यंदा केवळ १ लाख ९८ हजार १२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता आले नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अमलबजावणीचे निर्देश २९ जून रोजी शासनाने दिले होते. विलंबाने निर्णय झाल्याने योजना राबविण्याबाबत योग्यरित्या नियोजन करता आले नाही. त्यात पुरेशी प्रचार, प्रसिद्धी होऊ शकली नाही. शिवाय काही बँकांकडून पीक विमा हफ्ता भरून घेण्यास दिलेला नकार, महाभूलेख पोर्टलवर सातबारात तांत्रिक दोष, तसेच नेट कनेक्टिव्हीटचा खोटा आदि कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज भरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे शेतकºयांचा पीक विमा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र ारात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मूभाही दिली. तथापि, उपरोक्त अडचणींमुळे जिल्ह्यातील केवळ १ लाख ९८ हजार १२२ शेतकºयांना पीक विमा योजनेत सहभागी होता आले. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १४ हजार ५८९ आहे, तर १ लाख ८३ हजार ५३३ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार १२६ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ८६ हजार ४९८, तर २ लाख ९ हजार ६२७ बिगर कर्जदार शेतकरी होते.   पीक विमा योजनेत कर्जदार शेतकरी संख्येत मोठी घट जिल्ह्यात गतवर्षी ८६ हजार ४९८ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता, तर यंदा केवळ १४ हजार ५८९ शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकले. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हफ्ता भरून घेण्यास विविध बँकांनी केलेली टाळाटाळ, हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे जिल्ह्यातील स्थितीवरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा