‘नरेगा’मध्ये राज्यात ६.५० कोटी मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:23+5:302021-04-21T04:18:23+5:30
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट ६ एप्रिल ...

‘नरेगा’मध्ये राज्यात ६.५० कोटी मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट!
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट ६ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मजुरांना ‘नरेगा’ची कामे उपलब्ध करुन नियोजन करण्यात येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतींमार्फत शेतरस्ते, शौचालय, घरकूल, सिंचन विहिर, सिमेंट नालाबांध, वृक्षारोपण, तलाव आदी प्रकारची कामे करण्यात येतात. २०२१...२२ या आर्थिक वर्षात राज्यात ‘नरेगा’ अंतर्गत ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने शासनाच्या रोहयो विभागामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्हयास ‘नरेगा’ कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुषंगाने ‘नरेगा’ अंतर्गत कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यात जिल्हानिहाय अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात ६ कोटी ५० लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हयात सुरु करण्यात आली असून, मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बाबासाहेब गाडवे
उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला.