आता शाळांमध्येही महिला तक्रार निवारण कक्ष

By Admin | Updated: January 16, 2015 23:59 IST2015-01-16T23:59:37+5:302015-01-16T23:59:37+5:30

(निवृत्त) न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशी.

Now the women's grievance redressal cell in schools | आता शाळांमध्येही महिला तक्रार निवारण कक्ष

आता शाळांमध्येही महिला तक्रार निवारण कक्ष

कारंजा (जि.वाशिम) : महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या दृष्टिने राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश शासनाने गुरूवारी दिले आहेत.
राज्य शासनाच्या १ मार्च २0१0 रोजीच्या निर्णयानुसार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (नवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. राज्यातील प्रत्येक शाळेत महिला तक्र ार निवारण कक्ष स्थापन करणे, तसेच न्यायालय स्तरावर, ग्रामपातळीवर शाळा, महाविद्यालय स्तरावर व औद्योगिक आस्थापनांमध्ये महिलांक रीता तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या शिफारशी या समितीने केल्या होत्या. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, अध्यापक विद्यालये, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानंतर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शिक्षण संचालकांना राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची कारवाई तत्काळ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आणि जिल्हय़ातील माहिती एकत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय उपसंचालकांनी विभागीय स्तरावरील माहिती शिक्षण संचालकांना आणि शासनाला सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे. शिक्षण संचालक राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या कारवाईचा आढावा घेऊन तसा अहवाल शासनाला पाठवतील.

Web Title: Now the women's grievance redressal cell in schools