शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

.आता रेल्वे, फलाटांवरील बेवारस बालकांवर राहील नजर!

By admin | Updated: March 5, 2015 01:54 IST

रेल्वे प्रशासन घेणार दखल, दरवर्षी होतात लाखावर बालकं बेपत्ता.

राम देशपांडे / अकोला : रेल्वे गाड्या व फलाटांवर बेवारस स्थितीत फिरणार्‍या बालकांची दरवर्षीची सरासरी संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्याचे निर्देश केंद्रिय रेल्वे अधिकार्‍यांनी २ मार्च रोजी चारही झोनमधील रेल्वे स्थानक प्रबंधकांना दिले आहेत. २0१0 ते २0१४ या पाच वर्षात रेल्वेच्या चारही झोनमधील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) आणि गव्हर्मेंट रिझर्व पोलीस प्रोटेक्शन (जीआरपी) ला आढळून आलेल्या बेवारस बालकांची आकडेवारी ग्राहय़ मानून केंद्रीय रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी २0१४ मध्ये सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणावरून दरवर्षी ७0 हजार ते १ लाख २0 हजार बालके हरविल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे नोंदविल्या गेल्या आहेत. सर्वेक्षणाअंती स्पष्ट झालेल्या या आकडेवारीनंत र ेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर बेवारस स्थितीत फिरणारी बालके प्रवासादरम्यान आपल्या कुटुंबीयांपासून दुरावतात किंवा मतिमंद, अपंग किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेली अनाथ मुले काही लोक सोडून निघून जातात. आपल्या आप्तांपासून दुरावलेली ही मुले काही असामाजिक तत्त्वांच्या हाती लागत असल्याची गंभीर बाब भारतीय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासाठी रेल्वेस्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वाट चुकलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या आदर्श प्रणालीमध्ये गवसणार्‍या बालकांच्या सर्वसामान्य गरजा पूर्ण करून त्यांना कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रबंधकांना तसेच आरपीएफ व जीआरपी पोलिसांना देण्यात आले आहेत. *भुसावळ मंडळात गवसले ५२ बालकेभुसावळ मंडळात लहान बालकांची पळवून त्यांना इतर प्रदेशात विकणारी टोळी सक्रिय असल्याच्या बाबीला भुसावळ मंडळ रेल्वे पोलीस आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे. त म्हणाले की, नाशिक रोड ते बडनेरा या मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात वर्ष २0१४ मध्ये ५२ बालके रेल्वे पोलिसांना गवसली. नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वे स्थानकांवर आढळून आलेल्या या बालकांना प्रथम भुसावळ येथील बाल सहाय्यता केंद्रात आणले जाते. या ठिकाणी त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न केले जातात. बेवारस स्थितीत सापडलेल्या मुलांची प्राथमिक माहिती व त्यांचे फोटो रेल्वेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातात. कुणीच नसलेल्या बालकांना अखेरीस जळगावच्या राज्यस्तरीय बाल सहाय्यता कमिटीच्या सुपूर्द केले जाते, असेही त्यांनी सांगितले.