आता महापौरांच्या कक्षात ठिय्या

By Admin | Updated: May 31, 2017 02:19 IST2017-05-31T02:19:36+5:302017-05-31T02:19:36+5:30

शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत घोषणा

Now stays in the mayor's room | आता महापौरांच्या कक्षात ठिय्या

आता महापौरांच्या कक्षात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: करवाढीच्या विरोधात सोमवारी महापालिका आमसभेत आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्यावर एक दिवसासाठी निलंबनाची कारवाई केली. सेनेच्या या आंदोलनामुळे निलंबित झालेल्या नगरसेवकांचे सर्वसामान्य अकोलेकरांकडून ठिकठिकाणी हारतुरे देऊन कौतुक होत आहे. अकोलेकरांकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महापौर विजय अग्रवाल यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विद्यायक मार्गाने आम्ही ठिय्या देऊ; पण आमच्यासोबत हुज्जत घातली गेली तर शिवसेनेच्या स्टाइलने आंदोलनाची भूमिका बदलली जाईल, असा इशारा शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांनी दिला. आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या गांधी मार्गावरील कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली गेली. याप्रसंगी सेना शहरप्रमुख तरुण बगेरे, नगरसेविका मंजूषा शेळके, गजानन चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेनेने ८० टक्के समाजकारणच केले, राजकारण केवळ २० टक्के केले. करवाढीच्या विरोधात सेनेची भूमिका अकोलेकरांसोबत आहे. भाजपाने बडतर्फीची कारवाई केली तरी आम्ही भूमिका बदलणार नाही, असेही येथे मिश्रा म्हणाले. जर बजेटच्या मिटिंगमध्ये चार तास साफसफाईवर चर्चा होते, मग आमसभेत करवाढीसंदर्भात चर्चा का घेतली जात नाही? विशेष सभेची मागणी आम्ही केली तेव्हा महापौरांनी घेणार नाही, अशी भाषा वापरली. शेवटी याबाबत शिवसेनेला आंदोलनात्मक भूमिकेशिवाय पर्याय राहिला नव्हता. आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू, ज्या पक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना आमच्या सोबत यायचे असेल त्यांचे स्वागत आहे. काही भाजपचे नगरसेवकही आमच्या भूमिकेसोबत असल्याचे मिश्रा यांनी येथे सांगितले.
अकोला महापालिकेत सबका साथ, खुदका विकास सुरू आहे. आम्ही मोदीच्या सबका विकासासोबत आहोत, असा आरोप त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केला.
पूर्वीच्या चार पट करवाढ आम्हाला मान्य आहे; मात्र अव्वाच्या सव्वा केलेली करवाढ अकोलेकरांवर अन्यायकारक आहे. वेळ पडल्यास याप्रकरणी आम्ही जनहित याचिका दाखल करू. त्या दिशेने आमचे आमदार प्रयत्नशील आहेत. महापालिकेतील इतर पक्षांच्या नगरसेवकांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावे, असे आवाहनही शिवसेनेने केले. येत्या तीन दिवसात आपले आंदोलन छेडले जाईल, असेही मिश्रा सरतेशेवटी म्हणाले.

Web Title: Now stays in the mayor's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.