..आता लक्ष प्रक्रिया उद्येागावर !

By Admin | Updated: November 19, 2016 02:03 IST2016-11-19T02:03:45+5:302016-11-19T02:03:45+5:30

राज्यस्तरीय अँग्रोटेक कृषी प्रदर्शनात शेतक-यांना देणार नव तंत्रज्ञानाची मेजवानी.

Now the process of action will take place! | ..आता लक्ष प्रक्रिया उद्येागावर !

..आता लक्ष प्रक्रिया उद्येागावर !

अकोला, दि. १८- शेतकर्‍यांना सामाजिक,आर्थिकदृष्ट्या सबळ करायचे असेल तर त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणे व रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. हे विषय घेऊन २७ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय अँग्रोटेक कृषी प्रदर्शनात प्रात्यक्षिकासह शेतकर्‍यांचे प्रबोधन केले जाणार आहे. यासाठीची जय्यत तयारी आतापासूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केली आहे.
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८ व्या जयंतीचे औचित्य साधून कृषी विद्यापीठाच्या क्र ीडांगणावर २७ ते २९ डिसेंबर असे तीन दिवस कृषी प्रदर्शनाचे होत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, राज्य शासन, जिल्हा परिषद व संलग्न संस्थांच्या सहकार्याने अँग्रोटेक -१६ मध्ये शेतकर्‍यांना नव तंत्रज्ञानाची मेजवानी उपलब्ध करू न दिली जाणार आहे. या प्रदर्शनात विद्यापीठ शास्त्रज्ञांसोबत विविध विषयांवर दररोज चर्चासत्र घेतले जाणार आहेत. कृषी अवजारे, उत्पादने, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, ग्रामीण व्यवसाय उत्पादने, कृषी व ग्रामीण उद्योग, फळे व भाजीपाला उद्योग, कृषी संलग्नित योजना आदी दालने शेतकर्‍यांसाठी येथे असतील. विशेष म्हणजे बचत गटांचा सहभाग या प्रदर्शनात राहणार आहे. विद्यापीठांची प्रकाशने शेतकर्‍यांसाठी उपलब्ध असतील. यासाठीची कृषी विद्यापीठाने जय्यत तयारी केली आहे. प्रदर्शनाबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यावर्षीच्या राज्यस्तरीय अँग्रोटेक-२0१६ मध्ये कृषी प्रक्रिया उद्योग व रोजगार निर्मिती या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी परिसंवाद व प्रात्यक्षिक स्वरू पात शेतकर्‍यांचे प्रबोधन केले जाईल. विविध नव तंत्रज्ञानाची दालने येथे असतील.
डॉ. प्रदीप इंगोले, संचालक,
विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Now the process of action will take place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.