आता आषाढातही शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:20+5:302021-07-16T04:14:20+5:30
परवानगी ५० चीच, पण... अनलॉकमध्ये शासनाकडून लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी ५० लोकांच्या उपस्थितीची अट लावण्यात ...

आता आषाढातही शुभमंगल सावधान!
परवानगी ५० चीच, पण...
अनलॉकमध्ये शासनाकडून लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी ५० लोकांच्या उपस्थितीची अट लावण्यात आली आहे. तसेच कोविड नियमांचे पालन करत समारंभ पार पाडावा अशा सूचना आहे. परंतु, जिल्ह्यात होत असलेल्या लग्न समारंभांमध्ये नियमांची पायमल्ली होत आहे. यावेळी ३०० ते ४०० लोकांची उपस्थिती राहत असून, बहुतांश मंडळी मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
मंगल कार्यालयांना कोणी विचारेना!
कोरोनामुळे दीड वर्षापासून शहरातील मंगल कार्यालय संचालक मोठ्या अडचणीत आले आहेत.
लग्न समारंभ कमी लोकांच्या उपस्थितीत होत असून, मंगल कार्यालयात अत्यल्प लग्नकार्ये होत आहेत.
यंदाही मंगल कार्यालयात खूप कमी प्रमाणात लग्न समारंभ पार पडले. परिणामी, अडचणी वाढल्या.
आषाढात शुभ तारखा...
देवशयनी एकादशीनंतर चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे तेव्हापासून मुहूर्त राहत नाही. मात्र, अति आवश्यक असल्यास महाराष्ट्र पंचांगनुसार मुहूर्त देण्यात आले आहेत. असे असले तरीही वास्तुशांतीचे मुहूर्त राहणार आहेत. हिंदी पंचांगनुसार १८ ला शेवटचा मुहूर्त आहे.
- पंडित रविकुमार शर्मा