महापालिकेच्या शाळांमध्ये आता कॉन्व्हेंट

By Admin | Updated: May 30, 2017 02:04 IST2017-05-30T02:04:16+5:302017-05-30T02:04:16+5:30

काँग्रेस-शिवसेनेच्या बहिर्गमनानंतर अनेक ठराव पारित

Now the convent in municipal schools | महापालिकेच्या शाळांमध्ये आता कॉन्व्हेंट

महापालिकेच्या शाळांमध्ये आता कॉन्व्हेंट

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला महापालिकेच्या शाळांची अवस्था सुधारावी म्हणून महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून प्रायोगित तत्त्वावर कॉन्व्हेंट (बालवाडी) सुरू होणार आहे. सोमवारी महापालिकेच्या आमसभेत त्यास संमती देण्यात आली. महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना जरी सभागृहात उपस्थित नव्हत्या त्यामुळे उपायुक्त समाधान सोळंके यांनी महापालिकेच्या शाळांबाबत चांगली माहिती सभागृहास दिली.
अकोला महापालिका अधिनस्त असलेल्या शाळांमध्ये बालवाडी सुरू करून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा चांगला निर्णय घेतला गेला. सुभाष खंडारे, मुस्तफा या नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ७,२८४ असून ५८४ शिक्षक आहे. काही मानधन तत्त्वावर शिक्षक घेऊन त्यांच्याकडून बाल विद्यार्थ्यांना धडे दिले जातील. यामुळे महापालिकेच्या शाळांची अवस्था सुधरेल, असे उपायुक्त सोळंके यांनी सांगितले. या ठरावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
नगरसचिव अनिल बिडवे यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना मुदत वाढ देणेबाबत चर्चा करून ठराव संमत झाला. त्यानंतर आमसभेने अनेक ठरावांना मंजुरी दिली. करवाढीच्या मुद्द्यावर आंदोलन करीत काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर आमसभेने शांततेत चर्चा करून ठराव मंजूर केलेत. महापौर विजय अग्रवाल, आयुक्त अजय लहाने आणि उपायुक्त वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी समन्वयाने सोमवारी सभागृह चालविले. महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची देखभाल व साफसफाई महिला बचत गटांतर्फे करण्याचा, १६-१७ करिता प्राप्त सर्वसाधारण रस्ता अनुदानावरील निधीबाबत, महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यासाठी वाहन वापर क्षेत्र निश्चित करण्याबाबत, अकोला महापालिका क्षेत्र हद्दीनंतरचे उघड्यावर शौच करण्याचे प्रकार मुक्त करणे आणि प्रभाग ६ मधील रस्त्याचे बांधकाम करणे, याच प्रभागातील काँक्रिट नाल्याचे बांधकाम करणे, शक्कर बावडीतील रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि पवार नामक लिपिकास नांदेड येथे बदली देण्याचे ठराव पारित केले गेले. ठराव घेण्याच्या चर्चेत स्थायी सभापती बाळ टाले, हरीश काळे, माधुरी अग्रवाल, धनंजय धबाले, रहीम पेंटर, बबलू जगताप, राहुल देशमुख, अजय शर्मा,माधुरी बडोणे, आम्रपाली उपवर्ट, सुनील शिरसाट यांनी सहभाग नोंदविला.

महापालिकेच्या गुडमार्निंग पथकात नगरसेवक
स्वच्छ भारत मिशनच्या मोहिमेत आता उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिका मोहीम हाती घेत असून, त्यात महापालिकेचे नगरसेवक प्रामुख्याने सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त लहाने यांनी दिली.

Web Title: Now the convent in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.