आता ८४ दिवसांनंतर मिळेल काेविशिल्डचा दुसरा डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:51+5:302021-05-15T04:17:51+5:30
जानेवारी महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यासह शहरात काेराेना बाधितांच्या संख्येत माेठी वाढ झाल्याचे समाेर आले आहे़ रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा ...

आता ८४ दिवसांनंतर मिळेल काेविशिल्डचा दुसरा डाेस
जानेवारी महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यासह शहरात काेराेना बाधितांच्या संख्येत माेठी वाढ झाल्याचे समाेर आले आहे़ रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय यंत्रणा विस्कळीत झाली आहे़ काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत वयाेवृध्दांसह तरूणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे़ यादरम्यान,काेविशील्ड व काेव्हॅक्सिन लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर दुसरा डाेस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत़ लसीचा उपलब्ध साठा ध्यानात घेता केंद्र शासनाच्या स्तरावरून लसीचे वितरण केले जात आहे़ यामध्ये अनेकांचा दुसरा डाेस घेण्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यांची घालमेल सुरू झाली आहे़ नुकत्याच १२ मे राेजी केंद्र शासनाच्या काेविन ॲपमध्ये बदल करण्यात येऊन ४२ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस घेता येणार असल्याचे निर्देश जारी करण्यात आले हाेते़ त्यामध्ये आता नव्याने बदल करण्यात आला असून काेविशिल्ड लसीचा दुसरा डाेस घेण्यासाठी किमान ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण करण्याची अट नमूद करण्यात आली आहे़ किमान १२ आठवडे ते १६ आठवड्यापर्यंत ही लस घेता येणार आहे़
नागरिकांनाे चिंता नकाे, खबरदारी घ्या !
काेविशील्ड लसीचा दुसरा डाेस घेण्याच्या निकषांत बदल करण्यात आला असला तरीही दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ व वयाेवृध्द नागरिकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही़ काेविशिल्डचा पहिला डाेस घेतल्यानंतर शरीरात ५० टक्के पेक्षा अधिक ॲन्टीबाॅडीज तयार हाेतात़ त्यामुळे काेराेनाचा धाेका कमी हाेत असला तरी काेराेना विषाणूमध्ये हाेणारे जनुकीय बदल लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे़