खरप राेडवरील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST2021-08-19T04:24:06+5:302021-08-19T04:24:06+5:30

पंचशीलनगर येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड सुहास सुरेश वाकाेडे (२३) हा कुख्यात गुंड असून, पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर ...

The notorious goons on Kharap Road have been stationed for a year | खरप राेडवरील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध

खरप राेडवरील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध

पंचशीलनगर येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड सुहास सुरेश वाकाेडे (२३) हा कुख्यात गुंड असून, पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून, यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीएअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी निमा अराेरा यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई अकाेला पाेलिसांनी केली.

एका वर्षात ३५ गुंडांचा बंदाेबस्त

जुलै २०२० ते २०२१ या एका वर्षाच्या कालावधीत अकाेला जिल्ह्यातील तब्बल ३५ गुंडांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. राज्यात हा आकडा सर्वाधिक असून, यापूर्वी एवढ्या माेठ्या प्रमाणात अशा कारवाया झाल्या नसल्याचे वास्तव आहे. ३५ गुंडांवर एमपीडीए कारवाई करून त्यांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Web Title: The notorious goons on Kharap Road have been stationed for a year