मनपा हद्दवाढीची अधिसूचना जारी

By Admin | Updated: March 19, 2016 01:58 IST2016-03-19T01:58:41+5:302016-03-19T01:58:41+5:30

हरकती-सूचना नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत.

Notification of Municipal boundary extension | मनपा हद्दवाढीची अधिसूचना जारी

मनपा हद्दवाढीची अधिसूचना जारी

अकोला: महापालिकेच्या हद्दवाढीची प्राथमिक अधिसूचना नगर विकास विभागाने १७ मार्च रोजी प्रकाशित केली. अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत विभागीय आयुक्त,अमरावती यांच्याकडे नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येतील. मनपाच्या स्थापनेनंतर शहरातील नागरिकांना उपलब्ध मूलभूत सोयी-सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आदी सुविधांचा ग्रामस्थांना आपसूकच लाभ मिळत आहे. हद्दवाढ होण्यासाठी अकोलेकरांना तब्बल १५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. शहरासह गावांतील लोकसंख्येचे निकष लक्षात घेऊन आयुक्त अजय लहाने यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावाचा शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा हद्दवाढीसाठी सकारात्मक असल्याचे दिसून आले. हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांनी १६ मार्च रोजी स्वाक्षरी केल्यानंतर १७ मार्च रोजी प्राथमिक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. विभागीय आयुक्त,अमरावती यांच्याकडे नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येतील. १७ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Notification of Municipal boundary extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.