मांसाहाराने औषधांची मात्रा निष्प्रभ!
By Admin | Updated: November 22, 2014 01:01 IST2014-11-22T01:01:18+5:302014-11-22T01:01:18+5:30
रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम; शाखाहारच प्रकृतीस पोषक.

मांसाहाराने औषधांची मात्रा निष्प्रभ!
अकोला: मांसाहाराने, विशेषत: कोंबडीच्या मांसाचे अतिसेवन केल्याने औषधांची मात्रा निष्प्रभ होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी पोल्ट्री व्यावसायीक टेट्रासाय क्लीन, फ्ल्यूरोक्विनोलीन व अमिनोग्लायकोसाईड या अँटीबोयोटिक्सचा भरमसाठ वापर करीत असल्याने, त्याचे घातक परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
मांसाहाराने शरिराला बळ मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा गैरसमज मोठय़ा प्रमाणात रूढ झाला आहे. वास्तविक, मांसाहार, विशेषत: कोंबड्यांचे मास मनुष्यासाठी घातक ठरत आहे. पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी अँटिबायोटिक्स औषधांचा वापर त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात केला जातो. या कोंबड्यांचे मांस सतत सेवन केल्यास, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याचे आरोग्यावर दूष्परिणाम होत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी काढले आहेत. कुक्कुट व्यावसायिक जास्त नफ्यासाठी कोंबड्यांचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी टेट्रासायक्लिन, फ्ल्यूरोक्विनोलोन व अमिनोग्लायकोसाईड या अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर केला जातो. हीच अँटिबायोटिक औषधे विविध मानवी आजारावरही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जातात. कोंबड्यांचे वजन वाढीसाठीही सारख्याच औषधांचा वापर होत असल्याने, मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. या मासांच्या सेवनामुळे मनुष्याचे शरीर सामान्य औषधांना प्रतिसाद देत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पशु व मत्स्य विज्ञान पदव्युत्तर संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.सुनील हजारे यांनी बाजारात नव्याने उपलब्ध होत असलेल्या अँटिबायोटिक औषधाचा व त्याच प्रमाणे मानवी आरोग्यावर होणार्या परिणामावर संशोधन सुरु सून त्याविषयीच्या निष्कर्षाची प्रतिक्षा असल्याचे सांगीतले.