नोएलचा फुटबॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र

By Admin | Updated: September 3, 2015 23:55 IST2015-09-03T23:55:34+5:302015-09-03T23:55:34+5:30

अमरावती विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत नोएल स्कूलचा संघाचा समावेश.

Noel's football team qualifies for departmental tournament | नोएलचा फुटबॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र

नोएलचा फुटबॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र

अकोला: लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे ५ व ६ सप्टेंबर रोजी होणार्‍या अमरावती विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत नोएल स्कूलचा संघ १४ वर्षाआतील मुलींच्या गटात अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने केले आहे. संघामध्ये कर्णधार अनुजा सिरसाट, वीणा बनसोड, शिवाणी मेहरे, अदिती लाड, साक्षी भारसाकळे, दिव्या खंडारे, ओजस साळुंके, सृष्टी मालसुरे, सलोनी सपकाळ, तेजस्विनी भगत, महिमा खंडारे, मानवी बहाकार, पूर्वा वजिरे, रुद्रायणी पारसकर, अंजली चौथमल यांचा समावेश आहे. खेळाडूंना प्राचार्य अनोश मनवर, अनुल मनवर, मुख्याध्यापिका अर्पणा डोंगरे, क्रीडा प्रशिक्षक शरद पवार, नरेंद्र पटोकार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Noel's football team qualifies for departmental tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.