वर्कऑर्डर नाही; जलप्रदायचे अभियंता ‘नॉट रीचेबल’

By Admin | Updated: November 13, 2014 01:19 IST2014-11-13T01:19:12+5:302014-11-13T01:19:12+5:30

अकोला महानगरपालिकेतील प्रकार, प्रशासन सुस्त; सत्ताधारी झोपेत.

No work order; Water Supply Engineer 'Not Rechable' | वर्कऑर्डर नाही; जलप्रदायचे अभियंता ‘नॉट रीचेबल’

वर्कऑर्डर नाही; जलप्रदायचे अभियंता ‘नॉट रीचेबल’

अकोला : कंत्राटी सेवेचा कालावधी वाढवून देण्याच्या मुद्यावर महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याचे पाहून जलप्रदाय विभागातील अभियंत्यांनी अप्रत्यक्षपणे काम बंद आंदोलन छेडले असून, सर्वांनी भ्रमणध्वनी बंद केले आहेत. या प्रकारामुळे जलप्रदाय विभागातील कामकाज ठप्प झाले असून, शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होत आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागासह बांधकाम, मालमत्ता कर, विद्युतसह नगर रचना विभागात मागील दहा वर्षांपासून मानधन तत्त्वावर २३ कंत्राटी अभियंता कार्यरत आहेत. संबंधित कर्मचार्‍यांसह १६९ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मानधनाचा कालावधी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आला. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कंत्राटी सेवेचा कालावधी वाढवून देणे अपेक्षित असताना, संबंधित क र्मचार्‍यांना हेतुपुरस्सर झुलवत ठेवले जात आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना लेखी आदेश नसताना, प्रशासनाने काम करण्यास बजावले. यामध्ये अत्यावश्यक सेवा असलेल्या जलप्रदाय विभागातील अभियंत्यांचादेखील समावेश आहे. मानधनाचा कालावधी व वेतनात वाढ होईपर्यंत जलप्रदाय विभागातील सर्व अभियंत्यांनी भ्रमणध्वनी बंद ठेवून अप्रत्यक्षपणे काम बंद आंदोलन सुरू केल्याची माहिती आहे. यामुळे शहर पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होत असून, कामकाज ठप्प झाले आहे.

Web Title: No work order; Water Supply Engineer 'Not Rechable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.