शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

हिवाळी, उन्हाळी पिकांना धरणातून पाणी पुरवठा बंद; पिके आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:56 IST

अकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांना संरक्षित ओलितासाठी पाणी नाही.

- राजरत्न सिरसाटअकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांना संरक्षित ओलितासाठी पाणी नाही. जेथे थोडेफार पाणी तसेच वीज उपलब्ध आहे, तेथील शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.  खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेल्याने शेतकºयांची भिस्त रब्बी हंगामावर होती; पण परतीचा दमदार पाऊस न झाल्याने जमिनीत पूरक ओलावाच नव्हता. परिणामी, पश्चिम विदर्भातील एकूण रब्बीच्या क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र नापेर आहे. ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना आता पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील धरणात यावर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी न सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केल्याने शेतकरी हतबल झाला.   यावर्षी पश्चिम विदर्भात ९१ टक्के क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली. अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी ४८,१४७ पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी ४६,३५९ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. बुलडाणा जिल्ह्यात ९१ हजार १३६ हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आली असून, वाशिम जिल्ह्यात ३४,४४४ हेक्टरवर, यवतमाळ जिल्ह्यात ७६,३४३ तर अमरावती जिल्ह्यात ६२ हजार २६४ हेक्टरवर हरभरा पेरणी केली. हरभरा पिकाला जमिनीत ओलावा बºयापैकी लागतो, त्यानंतर हिवाळ्यातील थंडीमुळे हे पीक येते. तथापि, हरभरा पेरणीनंतर पंधरा दिवस ढगाळ वातावरण होते. त्याचा प्रतिकूल परिणाम या पिकावर झाल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांकडे संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे पाणी देऊन हरभरा जगविण्याचे शेतकºयांचे प्रयत्न सुरू  आहेत; पण बहुतांश शेतकºयांकडे पाण्याची सोय नाही.

 कृषी विद्यापीठातील हरभरा तुषार सिंचनावर!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हरभरा पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हरभºयाचे बीजोत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने हरभरा पेरणी केली; पण जमिनीत ओलावा नसल्याने कृषी विद्यापीठाला तुषार सिंचनावर हे पीक जगवावे लागत आहे.

शेतकºयांकडे संरक्षित ओलितासाठी पाणी उपलब्ध असेल, तर त्या पाण्याचे नियोजन करावे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र ठरवावे, तेवढ्याच क्षेत्राला पाणी द्यावे.- डॉ. सुभाष टाले,विभाग प्रमुख,मृद व जलसंधारण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेती