पेड लस नको; शासकीय केंद्रावरच लाभार्थींची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST2021-07-11T04:14:52+5:302021-07-11T04:14:52+5:30

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी प्रतिबंधात्मक ...

No tree glue; Crowd of beneficiaries at the government center! | पेड लस नको; शासकीय केंद्रावरच लाभार्थींची गर्दी!

पेड लस नको; शासकीय केंद्रावरच लाभार्थींची गर्दी!

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत शासकीय लसीकरण केंद्रासोबतच खासगी लसीकरण केंद्रांमध्येही लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते, मात्र अकोल्यात नागरिकांची पेड लसीकरणातही गर्दी शासकीय लसीकरण केंद्राबाहेर दिसून येते. क्वचितच नागरिक लस घेण्यासाठी खासगी लसीकरण केंद्रात पैसे देऊन लस घेत असल्याचे चित्र दिसून येते.

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस - ३,४६,३५८

दुसरा डोस - १,०१,३६१

कोविशिल्ड - ३,७६,१८९

कोव्हॅक्सिन - ७०,९३०

म्हणून शासकीय केंद्रांना प्राधान्य

राज्यात काही ठिकाणी नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीती तसेच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे बहुतांश लोक शासकीय लसीकरण केंद्रांमध्येच लस घेण्यास प्राधान्य देत असल्याच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अकोल्यातील लसीकरण मोहिमेचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले आहे. नागरिकांना सहज लसीचा डोस उपलब्ध होऊ लागला आहे.

खासगी लसीकरण केंद्रामध्ये केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध आहे, तर शासकीय लसीकरण केंद्रामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत.

Web Title: No tree glue; Crowd of beneficiaries at the government center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.