अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 18:27 IST2021-09-27T18:26:54+5:302021-09-27T18:27:02+5:30
No response to "Bharat Bandh" in Akola : नाना पटाेले हे स्वत: बंदसाठी अकाेल्यात मुक्कामी थांबले असतानाही अकाेल्यात नगण्य प्रतिसाद मिळाला.

अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली!
अकोला : शेतकरी व कामगाराविराेधी कायद्यांच्या विराेधात राजधानीच्या सीमेवर शेतकरी वर्षभरापासून आंदाेलन करत आहेत. या पृष्ठभूमीवर साेमवारी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेसने पाठिंबा दिला हाेता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले हे स्वत: बंदसाठी अकाेल्यात मुक्कामी थांबले असतानाही अकाेल्यात नगण्य प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पटाेलेंच्या नेतृत्वात काँग्रेसने माेटारसायकल रॅली काढून हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून रॅलीचा समाराेप केला.
शेतकरी विराेधी कायद्यांच्या विराेधातील आवाज दुर्लक्षित करून केंद्र सरकारने झाेपेचे साेंग घेतले आहे. सरकारने या आंदाेलनाकडे पाठ फिरविली आहे. केंद्राला जागे करत, जाब विचारण्यासाठी साेमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली हाेती. पटोले यांच्या नेतृत्वात स्वराज्य भवन येथून दुपारी १२.२०ला सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य बाजारपेठमार्गे हुतात्मा स्मारक येथे पोहोचल्यानंतर तेथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी ‘भारत बंद’कडे पाठ फिरविली. काँग्रेसच्या रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले, तेव्हा व्यापारी केवळ शटर खाली ओढून घेत होते. रॅली पुढे निघाली की, पुन्हा शटर उघडण्यात आले. या रॅलीमध्ये काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चाैधरी, जिल्हाध्यक्ष अशाेक अमानकर, विराेधी पक्षनेते साजीद खान पठाण, नगरसेवक डाॅ.जिशान हुसेन आदींनी सहभाग घेतला.