बंद नव्हे, तर अधिक सशक्त झाली ‘मनिऑर्डर’!
By Admin | Updated: April 16, 2015 00:34 IST2015-04-16T00:34:43+5:302015-04-16T00:34:43+5:30
ई-सेवेच्या माध्यमातून गती तीव्र.

बंद नव्हे, तर अधिक सशक्त झाली ‘मनिऑर्डर’!
अकोला : तार सेवेप्रमाणे बंद होणार म्हणून अलीकडे चर्चेत आलेली भारतीय डाक विभागाची मनिऑर्डर सेवा ई- सेवेच्या माध्यमातून अधिक सशक्त करण्यात आली आहे. १३ एप्रिल रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या भारतीय डाक विभागाच्या राष्ट्रीय बैठकीत याबाबतची घोषणा अधिकार्यांनी केली. कधीकाळी पैसे पाठविण्याकरिता सर्वाधिक सशक्त माध्यम म्हणून वापरात असलेली डाक विभागाची मनिऑर्डर सेवा, काळाच्या ओघात बंद पडते की काय, अशी स्थिती असताना डाक विभागाने तिला पुनरुज्जीवित केले आहे. पोस्टात मिळणारा विशिष्ट आकाराचा फार्म भरून त्याद्वारे केलेले बुकिंग आणि त्यानंतर अनिश्चितकालीन वितरण प्रक्रिया, यामुळे काळाच्या ओघात मागे पडत असलेल्या मनिऑर्डर सेवाला निश्चित स्थान मिळावे, याकरिता भारतीय डाक विभागाने ही सेवा प्रदान करण्याकरिता पूर्वी उपयोगात आणलेली प्रणाली बदलून तिला ई-सेवेचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. भारतीय पोस्ट खात्यामार्फत चालविल्या जाणार्या देशातील कुठल्याही पोस्टात ह्यई-एमओह्ण व ह्यआय-एमओह्ण या दोन प्रमुख नावाने ही सेवा नागरिकांकरिता उपलब्ध झाली आहे. आजच्या घडीला देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी भक्कम पाय रोवून त्यांच्या ग्राहकांसमोर एटीएम सारखा सशक्त पर्याय उभा केला आहे. कुठलाही आर्थिक बोजा न टाकता एटीएमद्वारे मनी ट्रान्सफर करता येणारी ही सेवा नक्कीच डाक विभागाच्या ह्यमनिऑर्डरह्णला आव्हान देणारी ठरत असली तरी, विश्वासार्हतेच्या जोरावर भारतीय डाक विभागाने या सेवेला पुनरुज्जीवित केले आहे. कोर्ट, शासकीय कार्यालये व विविध धार्मिक संस्थानांमार्फत मोठय़ा प्रमाणात डाक विभागाच्या मनिऑर्डर सेवेचा लाभ घेतला जात आहे. डाक विभागाची मनिऑर्डर बंद नव्हे तर, त्यास आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे पैसे पाठविताना पूर्वीप्रमाणे आता वेळ लागत नाही. ईएमओ (इलेक्ट्रॉनिक मनिऑर्डर) व आयएमओ (इन्स्टंट मनिऑर्डर) पाठविण्याची सुविधा डाक विभागाने अत्याधुनिक केली आहे. यामुळे दोन्ही सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना निश्चितच पूर्वीपेक्षा लवकर मनिऑर्डर पाठविणे शक्य झाले असल्याचे अकोला येथील पोस्ट मास्टर व्ही. पी. फिरके यांनी सांगीतले.