शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

अकोला जिल्ह्यात डेल्टाचा एकही पॉझिटिव्ह नाही; खबरदारी आवश्यक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:13 IST

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काेविडच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढत आहे.

- प्रवीण खेते

अकोला : राज्यातील काही जिल्ह्यात कोविडच्या डेल्टा प्रकारातील रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अकोल्यातूनही सुमारे ३०० कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे आरएनए सॅम्पल तपासणीसाठी दिल्ली येथील ‘आयजीआयबी’ लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. यातील बहुतांश अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती असून, काही अहवालांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धोका अजूनही टळला नसल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.जिल्ह्यातील कोविडची दुसरी लाट ओसरली आहे, मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काेविडच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दर महिन्याला कोविड बाधित शंभर रुग्णांचे आरएनए सॅम्पल तपासणीसाठी दिल्ली येथील आयजीआयबी लॅबमध्ये पाठविण्यात येत आहेत. यातील बहुतांश अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती आहे, तर काही चाचण्यांचे अहवालाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, मात्र अजूनही संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

धोका कायम, तरी अकोलेकर गाफील

डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात कोविडची स्थिती नियंत्रणात असली,तरी धोका अजूनही टळलेला नाही. अशा परिस्थितीतही अनेक नागरिक विनामास्क बाजारपेठेत फिरताना दिसून येत आहेत. अकोलेकरांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ही आहेत डेल्टा प्लसची लक्षणे

सामान्य लक्षणे

म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.

घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार

 

तीव्र लक्षणे

 

छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे.

हीदेखील आहेत लक्षणे

त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल

 

असा टाळता येईल धोका

 

घराबाहेर पडताना मास्कचा उपयोग करा.

 

आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा.

किमान २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा.

इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा, लोकांपासून ६ फूट अंतर ठेवा.

घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण करा.

बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.

जिल्ह्यात सध्याची स्थिती नियंत्रणात असून डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण आढळला नाही. असे असले तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही या विषयी मार्गदर्शन द्यावे. कोविडची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळतच चाचणी करून उपचारास सुरुवात करावी.

- डॉ. राजकुमार चव्हाण,उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या