एकही मृत्यू नाही, १७२४ चाचण्यांमध्ये केवळ ३७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:11+5:302021-06-17T04:14:11+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ९१६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

No deaths, only 37 positive in 1724 tests | एकही मृत्यू नाही, १७२४ चाचण्यांमध्ये केवळ ३७ पॉझिटिव्ह

एकही मृत्यू नाही, १७२४ चाचण्यांमध्ये केवळ ३७ पॉझिटिव्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ९१६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९०० अहवाल निगेटिव्ह आहेत. मंगळवारी दिवसभरात ८०८ रॅपिड अँटिजन चाचण्या झाल्या. त्यामध्ये केवळ २१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. अशा प्रकारे गत २४ तासांत १७२४ चाचण्यांमध्ये केवळ ३७ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाची लाट ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या १६ जणांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील एक, बाळापूर एक, पातूरएक, तेल्हारा एक व अकोला मनपा क्षेत्रातील १२ जणांचा समावेश आहे.

१७२ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, खासगी कोविड रुग्णालयांमधील २०, तर होम आयसोलेशनमधील १४८, अशा एकूण १७२ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

Web Title: No deaths, only 37 positive in 1724 tests