नितीन गडकरी सोमवारी पातुरात
By Admin | Updated: January 9, 2015 01:25 IST2015-01-09T01:25:22+5:302015-01-09T01:25:22+5:30
पत्रकार परिषदेत दिली माहिती.

नितीन गडकरी सोमवारी पातुरात
पातूर (अकोला) : येथील तुळसाबाई कांवल विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, १२ जानेवारी रोजी पातुर येथे येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म महोत्सव, स्वामी विवेकानंद यांची जयंती व येथील तुळसाबाई कावल विद्यालयाच्या श ताब्दी महोत्सवात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्हय़ाच्या दौर्यावर येणार आहेत. गडकरी यांच्यासोबत खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आमदार भाऊसाहेब फुंडकर उपस्थित राहणार आहेत. विद्यालयातील कार्यक्रम आटोपून गडकरी हे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
*पक्षाच्या विरोधात काम करणा-यांना प्रवेश देणार काय?
या पत्रकार परिषदेत तेजराव थोरात यांना भाजपच्या विरोधात काम करणार्यांना पक्षात घेणार काय याबाबत विचारणा करण्यात आली. नारायण गव्हाणकर काँग्रेसमध्येअसताना सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणार्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार काय, या प्रश्नाला उत्तर देताना थोरात यांनी हा माझ्या स्तरावरचा निर्णय नाही. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, असे थोरात म्हणाले.