वीटभट्टीच्या खदानीत बुडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: November 28, 2015 02:33 IST2015-11-28T02:33:40+5:302015-11-28T02:33:40+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना; पोलिसांत तक्रार दाखल.

Nine year old child dies due to immunization | वीटभट्टीच्या खदानीत बुडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

वीटभट्टीच्या खदानीत बुडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

चोहोट्टाबाजार (जि. अकोला ) : नजीकच्या करतवाडी रेल्वे शिवारातील वीटभट्टीच्या खदानीमध्ये बुडालेल्या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह २७ नोव्हेंबर रोजी आढळला. त्यामुळे परिसरातील खळबळ उडाली आहे. आदेश सतीश खारोडे असे त्या मृत बालकाचे नाव आहे. चोहोट्टाबाजार येथे मामाच्या घरी आलेला आदेश हा २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला होता. संध्याकाळ झाली तरी तो घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यासाठी करतवाडी शिवारातील वीटभट्टय़ांचा परिसर पिंजून काढण्यात आला. रात्री उशिरापर्यंंत आदेशचा शोध सुरू असताना एका वीटभट्टीच्या खदानीजवळ त्याचे कपडे व चप्पल आढळली. रात्रीच पाण्यामध्ये पुन्हा शोध घेण्यात आला तरीही आदेशचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता. दुसर्‍या दिवशी सकाळी आदेशचा शोध घेण्याकरिता परिसरातील नागरिकांनी पुन्हा वीटभट्टीच्या खदानीकडे धाव घेतली. यावेळी पाण्याने तुडुंब भरलेल्या खदानीमध्ये आदेशचा मृतदेह आढळून आला. त्याचे वडील सतीश खारोडे यांनी चोहोट्टा पोलीस चौकीत सदर घटनेची फिर्याद दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आकोट येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Web Title: Nine year old child dies due to immunization