शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वेगवेगळय़ा अपघातात नऊ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:56 IST

अकोला : जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा चार अपघातांत नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. चान्नी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झाले. तसेच चोहोट्टा बाजारजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने दोन जण, बाळापूरजवळ ट्रक उलटल्याने चालक व आलेगावजवळ ऑटोतून पडल्याने महिला जखमी झाली. 

ठळक मुद्देचान्नी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झालेचोहोट्टा बाजारजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने दोन जण जखमी झालेबाळापूरजवळ ट्रक उलटल्याने चालक जखमीआलेगावजवळ ऑटोतून पडल्याने महिला जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा चार अपघातांत नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. चान्नी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झाले. तसेच चोहोट्टा बाजारजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने दोन जण, बाळापूरजवळ ट्रक उलटल्याने चालक व आलेगावजवळ ऑटोतून पडल्याने महिला जखमी झाली. वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्यावर चान्नी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. विनोद हिवराळे रा. तुलंगा हे दुचाकीने घरगुती गॅस घेऊन डबल सीट जात होते. चान्नी फाट्याजवळ असलेल्या त्रिकोणी रस्त्यावर दिग्रस खुर्द येथील नागेश इंगळे हे दुचाकीने समोरून येत होते. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये तन्वी इंगळे, प्रदीप सिरसाट आणि विनोद हिवराळे हे गंभीर जखमी झाले, तर जगदेव इंगळे आणि नागेश इंगळे हे जखमी झाले. जखमींना तातडीने वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून सवरेपचार रुग्णालय अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. स्थानिक मंगेश इंगळे, भिकाजी इंगळे, अशोक इंगळे, मिलिंद इंगळे यांनी जखमींना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच सवरेपचार रुग्णालयात भारिप-बमसंचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मदत केली. चोहोट्टा बाजारजवळ दुचाकी क्र.एमएच २७ बीपी ७५६0 व एमएच ३0 टी ८५९३ यांच्यामध्ये समारासमोर धडक झाली. यामध्ये देवीदास वनारे व सारीका वनारे हे जखमी झाले. त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळापूर शहराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक क्र.एमपी 0९ एचएफ ८४४९ उलटला. त्यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. नायगाव देशमुख येथून नातेवाइकाच्या मयत आटोपून परत येत असताना ऑटो एमएच ३0 - २६९२ मधून पडल्याने आशाबाई बालुसिंग जाधव (वय ५0) रा. शेकापूर या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले.  

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात