नऊ सिलिंडर काढले; मोठा अपघात टळला!

By Admin | Updated: March 21, 2017 02:42 IST2017-03-21T02:42:46+5:302017-03-21T02:42:46+5:30

नऊ गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी मोठय़ा शिताफीने काढल्याने गांधी रोडवर होणारा मोठा स्फोट टळला.

Nine cylinders removed; Bigger trauma! | नऊ सिलिंडर काढले; मोठा अपघात टळला!

नऊ सिलिंडर काढले; मोठा अपघात टळला!

अकोला, दि. २0- उत्सव संकुलमध्ये लागलेल्या आगीच्यावेळी हॉटेल गिरीराज पॅलेसच्या चवथ्या माळय़ावरील किचनमध्ये असलेले नऊ गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोठय़ा शिताफीने काढल्याने गांधी रोडवर होणारा मोठा स्फोट टळला. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासमोर अग्निशमन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हे सिलिंडर काढण्याची मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केल्याने आयुक्त लहाने यांनी अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले. यावेळी अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांनीही आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

Web Title: Nine cylinders removed; Bigger trauma!