अकाेला महापालिकेच्या आयुक्तपदी निमा अराेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 19:51 IST2021-02-03T19:48:33+5:302021-02-03T19:51:06+5:30
Neema Arora जालना जिल्हा परिषदेत मुख्य कार्र्यकारी अधिकारी पदावर कार्र्यरत हाेत्या.

अकाेला महापालिकेच्या आयुक्तपदी निमा अराेरा
अकाेला: महापालिकेच्या आयुक्तपदी ‘आयएएस’निमा अराेरा यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने बुधवारी जारी केले. यापूर्वी त्या जालना जिल्हा परिषदेत मुख्य कार्र्यकारी अधिकारी पदावर कार्र्यरत हाेत्या. निमा अराेरा अत्यंत शिस्तप्रीय व पारदर्शी कामासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी हाेताच शहरातील अनेकांच्या तंबूत घबराट पसरल्याची माहिती आहे.
महापालिकेत मागील तीन वर्षांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काेट्यवधी रुपयांचे घाेळ चव्हाट्यावर आल्यानंतरही प्रशासनाकडून ठाेस कारवाइ हाेत नसल्याची बाब शासनाच्या निर्दशनास आली आहे. यादरम्यान, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीचे वारे वाहू लागले हाेते. मध्यंतरी आयुक्तपदासाठी राठाेड, सदांशिव तसेच सुनिल विंचनकर यांच्या नावाची चर्चा रंगली हाेती. अखेर शासनाने ‘आयएएस’दर्जाच्या अधिकारी निमा अराेरा यांच्या नियुक्तीवर शिक्कामाेर्तब केल्याचे समाेर आले आहे. बुधवारी शासनाने अराेरा यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
शुक्रवारी स्वीकारणार पदभार
आयुक्तपदी नियुक्त केलेल्या निमा अराेरा शुक्रवारी मनपात दाखल हाेणार असल्याची माहिती आहे. त्या पदभार स्वीकारणार नसल्याच्या वावड्या राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.
पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती
मनपाची २००१ मध्ये स्थापना झाली. या २० वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच मनपात महिला ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नियुक्ती हाेणार असल्याने अकाेलेकरांमध्ये त्यांच्या कामाच्या शैलीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी मनपातील भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खणून काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.