नायगाव ‘डम्पिंग ग्राउंड’लगतचे अतिक्रमण हटविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 02:40 IST2016-08-15T02:40:20+5:302016-08-15T02:40:20+5:30
अकोला महापालिकेच्या मालकीच्या डम्पिंग ग्राउंडवर भंगार व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले.

नायगाव ‘डम्पिंग ग्राउंड’लगतचे अतिक्रमण हटविले!
अकोला, दि. १४: कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवरील जागा अपुरी पडत आहे. परिसरातील अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अवैधरीत्या ताबा घेतल्याने समस्येत अधिकच भर पडल्याच्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने रविवारी मुस्लीम कब्रस्तानच्या भिंतीला लागून असलेल्या भंगार व्यावसायिकांचे कच्च्या स्वरूपाचे अतिक्रमण हटविण्यात आले. नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर डम्पिंग ग्राउंड निर्माण करण्यात आले. या ठिकाणी साचणार्या कचर्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत. शिवाय स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे कचरा साठवणुकीच्या संदर्भात विविध अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने सातत्याने वृत्त प्रकाशित करून कचर्याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. या समस्येची दखल घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रविवारी भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. या कारवाईत अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी विष्णू डोंगरे, संजय थोरात, प्रवीण मिश्रा, विजय बडोणे, अँड. प्रवीण इंगोले, नरेश बोरकर, विनोद वानखडे, रुपेश इंगळे, सिद्धार्थ सिरसाट, सै. रफिक, जेसीबी चालक बाबाराव शिरसाट, मधुकर कांबळे, सोनू वाहुरवाघ यांचा सहभाग होता.