नव्या महापौरांची निवड १0 सप्टेंबरला

By Admin | Updated: September 3, 2014 01:18 IST2014-09-03T01:13:37+5:302014-09-03T01:18:21+5:30

अकोला महानगर पालिके च्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त निघाला; १0 सप्टेंबर रोजी निवडणूक.

The new Mayor will be elected on 10th September | नव्या महापौरांची निवड १0 सप्टेंबरला

नव्या महापौरांची निवड १0 सप्टेंबरला

अकोला: महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त निघाला असून, येत्या १0 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अरुण शिंदे निवडणूक प्रक्रिया पार पाडतील. निवडणुकीची तारीख जाहीर होताच मनपात राजकीय सारीपाटावरील हालचालींना वेग आला आहे.
महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने नवीन महापौर व उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. मनपात २0१२ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण निघाले होते. हा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने आगामी अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये अकोला मनपासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. आरक्षणाची अधिसूचना २९ ऑगस्ट रोजी मनपाला प्राप्त झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. यावर येत्या १0 सप्टेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी मनपासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

*भाजप-काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच
४अकोला शहराचा नवीन महापौर कोण होईल, याकरिता अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपातील सत्तापक्ष काँग्रेस व विरोधी पक्ष भाजपने महापौरपद ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू के ल्या आहेत. काँग्रेसमधील इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली आहे, तर भाजपचे सर्वाधिकार स्थानिक खासदारांकडे असल्याची माहिती आहे.

Web Title: The new Mayor will be elected on 10th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.