असदगडला मिळणार नवीन रूप
By Admin | Updated: September 11, 2014 01:13 IST2014-09-11T01:13:23+5:302014-09-11T01:13:23+5:30
अकोला शहराचा ऐतिहासिक वारसा; केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याचे झाले सर्वेक्षण.

असदगडला मिळणार नवीन रूप
अकोला : अकोला शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या असदगड किल्लय़ाच्या दुरवस्थकडे पुरातत्त्व खात्याचे लक्ष वळले आहे. बुधवारी या खात्याच्या अधिकार्यांनी असदगड किल्लय़ाची पाहणी केली. ते आपला अहवाल केंद्र शासनाकडे पाठविणार असून, असगदगडच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी मिळणार असल्याचे समजते. अकोल्यातील असदगड किल्ला शिवकाळापासून अस्तित्वात आहे. औरंगजेबाचा सरदार असद याने या किल्लय़ाची निर्मिती केल्याचा इतिहास आहे. वर्हाडातील राजकीय हालचालीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून त्या काळी असदगडचे मोठे महत्त्व होते. इंग्रज कालखंडातदेखील या किल्लय़ाचे वैभव जपल्या गेले. अकोल्याच्या किल्लय़ाची दुरवस्था थांबावी व या किल्लय़ाचा विकास व्हावा, यासाठी अकोलेकर नागरिक सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्याची दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व विभाग नवी दिल्लीच्या नागपूर कार्यालयाचे पुरालेख निरीक्षक जी.एस. ख्वाजा बुधवारी अकोल्यात आले होते. त्यांनी संपूर्ण किल्लय़ाची पाहणी केली. हा पाहणी अहवाल ते दिल्लीला पाठविणार आहेत.