धनंजय कपाले /वाशिमकैद्यांची वाढणारी संख्या आणि अपुरी पडणारी कारागृहे यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता, गृह विभागाने वाशिम जिल्हा कारागृहाची निर्मिती करून बरीच वर्षे लोटली. या नवीन कारागृहाची दारे १ ऑक्टोबर रोजी उघडली जाणार असून, तशा सूचनाही जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक (तुरूंग) यांनी पाठविल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेकडो आरोपींची ने-आण करताना, गत अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर ताण वाढू लागला. पोलिस यंत्रणेवरील हा ताण कमी करण्यासाठी गृह विभागाने वाशिम येथे नवीन जिल्हा कारागृहाची निर्मिती केली. हे कारागृह ५00 कैद्यांच्या क्षमतेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अकोला येथील तुरूंगात असलेल्या कैद्यांना १ ऑक्टोबरपासून वाशिम तुरूंगात हलविले जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने या कारागृहाची दारे प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीतच उघडणार आहेत. वाशिम पोलिस दलासाठी हे कारागृह सोयीचे ठरणार आहे. वाशिमसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी, आचारसंहितेमुळे कोणत्याही नेत्याला कारागृहाचे ह्यराजकारणह्ण करता येणार नाही, हे तेवढेच सत्य.**वाशिम पोलिस दलाचा खर्च वाचलावाशिम जिल्ह्यातील कैद्यांची ने-आण करण्यासाठी पोलिस खात्याच्या वाहनांवर डिझेलचा खर्च मोठय़ा प्रमाणात करावा लागत होता. या खर्चासाठी महिन्याकाठी कमीत कमी लाख रूपयांची तरतूद करावी लागत होती. आता मात्र हा खर्च करण्याची गरजच उरली नाही. याशिवाय आरोपींना अकोला येथे ने-आण करण्यासाठी पोलिस कर्मचारी ५ ते ६ तासासाठी अकोला येथे रवाना करावे लागत होते. आता पोलिसांचा हा ताणही कमी झाला आहे. यामुळे पोलिस दलामध्ये या निर्णयाने समाधान व्यक्त होत आहे.
वाशिमच्या कैद्यांना नवीन ‘घर’
By admin | Updated: September 18, 2014 01:26 IST