शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

नवी आशा; नवे संकल्प.. गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी नववर्षाची पहाट उगवावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:45 IST

अकोला : निरोपाचे शब्द नको.. कर स्वागत उगवत्याचे, ही आपली संस्कृती. गत वर्षभरात अनेक चांगल्या, वाईट घटना, निर्णय अकोलेकरांनी अनुभवले; परंतु आलेले २0१८ हे नववर्ष नव्या स्वप्नांचे नवे संकल्प घेऊन आले आहे. या नव्या संकल्पांची ही नवीन पहाट उगवली. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाने गतवर्षी दिलेल्या आश्‍वासनांची या नव्या वर्षात पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा करूया. आलेले वर्ष गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी ठरो..

ठळक मुद्देमोर्णा शुद्धीकरणाची मोहीम यशस्वी व्हावी!सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण व्हावे!बसस्थानकाचा श्‍वास व्हावा मोकळा! एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी ठरावे नववर्ष!

अकोला : निरोपाचे शब्द नको.. कर स्वागत उगवत्याचे, ही आपली संस्कृती. गत वर्षभरात अनेक चांगल्या, वाईट घटना, निर्णय अकोलेकरांनी अनुभवले; परंतु आलेले २0१८ हे नववर्ष नव्या स्वप्नांचे नवे संकल्प घेऊन आले आहे. या नव्या संकल्पांची ही नवीन पहाट उगवली. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाने गतवर्षी दिलेल्या आश्‍वासनांची या नव्या वर्षात पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा करूया. आलेले वर्ष गुन्हेगारीमुक्त, आरोग्यदायी ठरो..

राज्यामध्ये अकोला शहर अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. गुन्हेगारीचा आलेखही येथे चढताच आहे. गतवर्षात जिल्हा व शहरात ३६ हत्या झाल्या. ५९ दरोड्यांच्या घटना घडल्या. १४६ घरफोड्या झाल्या. १९१ विनयभंग आणि ६३ बलात्काराच्या घटना घडल्या. जिल्हय़ातील गुन्हेगारी पाहता, शहरामध्ये पोलीस आयुक्तालय निर्मितीची मागणी पुढे आली. पोलीस अधीक्षकांकडून पोलीस आयुक्तालयाचा प्रस्तावही पाठविला; परंतु तीन वर्षांपासून हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे धूळ खात पडून आहे. तसेच पोलीस गृहनिर्माण सोसायटीसाठी शासनाने ९७.७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निमवाडी परिसरातील जागेवर प्रस्तावित ३७८ घरांच्या २६ डिसेंबर रोजी निविदा निघाल्या. त्यामुळे या नवीत वर्षात पोलीस आयुक्तालयासोबतच पोलिसांसाठी महत्त्वाच्या असलेल्या घरांची निर्मिती व्हावी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण यावे, अशी अपेक्षा अकोलेकरांना आहे. आरोग्याच्या बाबतीतही विचार केल्यास, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. नववर्षामध्ये अकोलेकरांच्या सेवेत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच शिवापूर येथे प्रस्ताविक जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मार्ग मोकळा व्हावा आणि त्याची वर्षपूर्ती व्हावी, शिक्षण क्षेत्रातील गोंधळ संपून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यादायी हे नववर्ष ठरावे, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. 

मोर्णा शुद्धीकरणाची मोहीम यशस्वी व्हावी!अकोला शहरातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या शुद्धीकरणाची मोहिम प्रशासने हाती घेतली आहे. १३ जानेवारीपासून सुरु होणारी ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी झाली तर शहरासाठी ती मोठी उपलब्धी ठरणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेला सर्वच स्तरातून सहकार्य मिळायला हवे.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण व्हावे!केंद्र शासनाने शहरात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केले. या हॉस्पिटलच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या हॉस्पिटलचे बांधकाम गतीने करून नव्या वर्षामध्ये अकोलेकरांच्या सेवेत हे हॉस्पिटल अर्पण व्हावे आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात. 

बसस्थानकाचा श्‍वास व्हावा मोकळा! अकोला आगार क्रमांक एक प्रमाणेच आगार दोनची इमारतही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. जर समोरचे अतिक्रमण काढले गेले, तर अकोला आगार क्रमांक दोनच्या मध्यवर्ती बसस्थानकाचा श्‍वास मोकळा होऊ शकतो, येत्या नूतन वर्षात हे अपेक्षित आहे.

एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या अकोल्याची औद्योगिक वसाहत अमरावती विभागात सर्वात जास्त महसूल देणारी असली तरी येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. एमआयडीसीमधील पाणी टंचाईची समस्या  गेल्या अनेक वर्षांपासून आहे. यंदा मजीप्राने १७ कोटींची पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव पाठविला आहे, आगामी वर्षात तरी ही समस्या सुटेल, अशी अपेक्षा शेकडो उद्योजकांना लागली आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी ठरावे नववर्ष!गत वर्षभरामध्ये शिक्षणविरोधी अनेक घटना घडल्या. जि.प.च्या १३१४ शाळा बंद केल्या. पटसंख्या घटल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले. ‘बीएलओ’ने काम नाकारल्यामुळे शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले. आता शाळांचे खासगीकरण करून शिक्षकांना देशोधडीला लावण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आलेले नवे वर्ष शिक्षण आणि शिक्षकांसाठी आशादायी जावो, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरNew Year 2018नववर्ष २०१८