नया अंदुरा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:02+5:302020-12-29T04:18:02+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच गाव पातळीवर राजकीय पुढारी आपला सरपंच व्हावा, यासाठी पॅनल उभे करीत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते ...

नया अंदुरा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच गाव पातळीवर राजकीय पुढारी आपला सरपंच व्हावा, यासाठी पॅनल उभे करीत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे सध्या निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. नया अंदुरा येथील सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते; परंतु आता सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने सर्व जन पॅनल करून निवडणुकीची तयारी करीत आहेत. कडाक्याच्या थंडीत शेकाेट्या पेटल्या असून, गावगप्पांना उधाण आले आहे. यावेळच्या निवडणुकीत गावातील युवकांनी उडी घेेतली आहे. सरपंच पद मिळविणे प्रस्थापितांसमोर आव्हान राहणार आहे.