शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नेर धामणा प्रकल्प पोहोचला ८९0 कोटींवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 8:02 PM

पूर्णा नदीवरील पूर्णा बॅरेज प्रकल्प तालुक्यातील मौजे धामणा या गावाजवळ तापी खोर्‍यात सुरू करण्यासाठी सन २00८ मध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय मान्यत घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटी होती. पण हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने आज या प्रकल्पाची किंमत ८८२ कोटीच्या घरात पोहोचली असून अजुनही हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने प्रकल्पामागील उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देप्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटीप्रकल्पाचे ८0 टक्के काम पूर्ण : पूर्णत्वाची अजुनही प्रतीक्षाच

अनिल अवताडे लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : पूर्णा नदीवरील नेर धामणा प्रकल्प तालुक्यातील मौजे धामणा या गावाजवळ तापी खोर्‍यात सुरू करण्यासाठी सन २00८ मध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय मान्यत घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटी होती. पण हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने आज या प्रकल्पाची किंमत ८८२ कोटीच्या घरात पोहोचली असून अजुनही हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने प्रकल्पामागील उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येते.पश्‍चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात हा प्रकल्प येत असून या प्रदेशातील भुगर्भातील पाणी हे क्षारयुक्त व खारे असल्याने पिकांच्या सिंचनाकरिता विहिरीद्वारे किंवा कूपनलिकेद्वारे वापर करण्यात येत नाही. या प्रकल्पाशिवाय सिंचनाचे दुसरे कुठलेही स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे सिंचन आयोगाच्या शिफारशीनुसार या खारपाणपट्ट्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील, या उद्देशने प्रकल्पाचा पाणीसाठा ८.१७९ द.ल.घ.मी. असून त्याद्वारे २७.५८५ द.ल.घ.मी. पाणी वापर प्रस्तावित आहे. त्याद्ववारे ६ हजार ९५४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणर असून भुजल पातळीमध्ये वाढ होणार आहे. पिण्याच्या पाण्याकरिता १.२२ द.ल.घ.मी. आरक्षण आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटून लाभक्षेत्रातील पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये वाढ होईल. गोड पाण्यामुळे व त्याच्या वापरामुळे काही भागातील खारेपणा कमी होण्यास मदत होईल व परिसरामध्ये रोजगार निर्मिती होईल, असे या प्रकल्पापासून फायदे असल्यामुळे या प्रकल्पाला संबंधित विभागाकडून ऑक्टोबर २00८ मध्ये मंजुरात मिळून प्रकल्पाची किंमत १८१.९९ ठरली. त्यानंतर प्रकल्पाच्या किमतीत संकल्प चित्रातील बदल अधिक दराने निविदा स्वीकृती, अनुषंगीक खर्चातील वाढ इ. कारणामुळे वाढ झाल्याने सन २0१0-११ मध्ये दरसुचीवर आधारित ६३८ कोटी ३४ लाख या किमतीस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच प्रकल्पाचे रुपये ८८८.८१ कोटी किमतीचे द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचे अंदाजपत्रक राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांचेकडून तांत्रिक तपासणी झाली असून प्रस्ताव सचिव स्तरावरील त्रिसदस्यीय समितीकडे सादर करण्यात आला. प्रकल्पाकरिता ३५.९४ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून आतापर्यंत सरळ खरेदीद्वारे २२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. 

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेजDamधरण