नेपाळच्या शिष्टमंडळाने केला बुलडाणा अर्बन बँकेचा अभ्यास

By Admin | Updated: February 6, 2016 02:16 IST2016-02-06T02:16:47+5:302016-02-06T02:16:47+5:30

सोशल बँंकिंग मॉडेल नेपाळमध्ये राबविणार असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी स्पष्ट केले.

Nepalese delegation conducted Buldhana Urban Bank Study | नेपाळच्या शिष्टमंडळाने केला बुलडाणा अर्बन बँकेचा अभ्यास

नेपाळच्या शिष्टमंडळाने केला बुलडाणा अर्बन बँकेचा अभ्यास

बुलडाणा : सहकार क्षेत्रात सोशल बँकिंगचा प्रयोग करीत बुलडाणा अर्बनने आशिया खंडात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पारदर्शक व्यवहार व लोकाभिमुख कार्यप्रणाली यामुळे बुलडाणा अर्बनची भूरळ अनेक देशांना पडली असून, नेपाळमध्ये कार्यरत असलेल्या सर्वात मोठय़ा १५ पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक व अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने बुलडाणा अर्बनच्या कार्यप्रणालीचा तीन दिवस अभ्यास केला. अभ्यास दौर्‍यातील सदस्यांनी बुलडाणा अर्बनचे सोशल बँकिंग मॉडेल सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट करीत हाच पॅटर्न नेपाळमध्ये राबविण्यार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नेपाळच्या सहकार व बँकिंग क्षेत्रात काम करणार्‍या या अभ्यासगटाचे नेतृत्व इंदिरा पंत यांनी केले. त्यांच्या समवेत मनोज भंडारी, केदार मनांधर, प्रकाशकुमार बर्मा, सीताराम काफले, माधवप्रसाद पौडल, रामचंद्र उपरेती, साबिना शाकिया, बिरेंद्रकुमार बालामी, सुरेंद्रराज खत्री छेत्री, विजयकुमार महाजन, निर्जला ङ्म्रेष्ठा, केशवप्रसाद पोखरेल, गणेश बहादूर, राजकुमार खडका आदी पदाधिकारी, अधिकार्‍यांचा समावेश होता. या सदस्यांना बुलडाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा इंटरनॅशनल को-ऑप. एलायन्स एशिया पॅसिपिक युथ कमिटीचे पहिले भारतीय चेअरमन डॉ.सुकेश झंवर यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या नावीण्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कापसापासून थेट कापड तयार करणार्‍या डोंगरखंडाळा येथील देशातील पहिल्या बुलडाणा अर्बन टेक्सस्टाइल मिल प्रकल्प, दाल मिल, वॉटर एटीएम, सहकार विद्या मंदिर, शेततलाव, चिखली येथील कोल्ड स्टोरेज, संस्थेचा क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आदी सर्व प्रकल्पांना शिष्टमंडळाने भेट दिली. मोताळा येथील सहकार विद्या मंदिर, तेथील संस्थेचे शाखा कार्यालय, मलकापूरचा वॉटर बॉटलिंग प्लँट, बुलडाणा येथील संस्थेच्या मुख्यालयातील विविध विभागांना तसेच संस्थेच्या बायोगॅस, ऊर्जा बचत प्रकल्प, ब्लड बँक, कंझ्युमर स्टोअर्स, छात्रा निकेतन, शिर्डी येथील इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.

Web Title: Nepalese delegation conducted Buldhana Urban Bank Study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.