शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

गतवर्षीच्या तुलनेत नीटचा पेपर सोपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:03 IST

अकोला: दरवर्षी एनईईटी(नीट) परीक्षेचा पेपर हा कठीण निघत असतो; परंतु यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेला नीटचा पेपर अत्यंत सोपा असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया रविवारी परीक्षा केंद्रांवर ऐकायला मिळाल्या.

अकोला: दरवर्षी एनईईटी(नीट) परीक्षेचा पेपर हा कठीण निघत असतो; परंतु यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेला नीटचा पेपर अत्यंत सोपा असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया रविवारी परीक्षा केंद्रांवर ऐकायला मिळाल्या. पेपर सोपा निघाल्यामुळे यंदा ‘कट आॅफ’ वाढण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अकोल्याला नीट परीक्षेचे प्रथमच परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. रविवारी शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर आठ हजारांवर विद्यार्थ्यांनी पेपर दिला.मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षा घेण्यात येते. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची समजली जाणारी एनईईटी (नीट) परीक्षा ५ मे रविवारी शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर प्रथमच पार पडली. वैद्यकीय परीक्षेसाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा काठिण्य पातळीची समजली आहे. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात. यंदाही नीटचा पेपर कठीण येईल, अशी अपेक्षा होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेने यंदा नीटचा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित बरेच प्रश्न हे कठीण असतात; परंतु यंदा मूलभूत संकल्पनेवर आधारित भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न पेपरमध्ये होते. नीट परीक्षेत जीवशास्त्र विषयावर ९0 प्रश्न, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयावर प्रत्येकी ४५ प्रश्न विचारण्यात आले. यंदा पेपर सोपा असल्याने, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. त्यामुळे यंदा वैद्यकीय प्रवेशाचा ‘कट आॅफ’ वाढण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनीही लोकमतशी बोलताना व्यक्त केली.विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी!नीटचा अत्यंत महत्त्वाचा पेपर असल्यामुळे शहरातील व बाहेरगावचे पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजतापासूनच परीक्षा केंद्रांवर हजर होते. शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी मोठी गर्दी केली होती.विद्यार्थ्यांची कसून तपासणीसर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना कोणतीही वस्तु अथवा शैक्षणिक साहित्य परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई करण्यात आली होती. एनटीए मार्फतच विद्यार्थ्यांना बॉलपेन पुरविण्यात आले होते.गतवर्षीपेक्षा यंदा नीटचा पेपर अत्यंत सोपा होता. त्यामुळे पेपरदरम्यान कोणतीही अडचण गेली नाही. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. वेळेतच पेपर मिळाला.-पूजा ठाकरे, विद्यार्थिनी.

पेपर कठीण आला तर काय होईल, अशी मनात भीती होती; परंतु पेपर सोपा आला. भौतिकशास्त्र विषयावरील प्रश्नही सोपे होते. त्यामुळे येणारा निकाल निश्चितच चांगला लागेल.-भक्ती पाटील, विद्यार्थिनी.नीटच्या पेपरबाबत मनात भीती होती की पेपर कसा निघेल; परंतु पेपर हाती आल्यावर सोपा असल्याचे दिसून आले.-गौरव अघडते, विद्यार्थिनी.

 

टॅग्स :AkolaअकोलाNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८