शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

खरिपासाठी लागणार ६४ हजार क्विंटल बियाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 2:00 PM

अकोला: येत्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी सर्व वाणांचे बियाणे मिळून ६४२३१ क्विंटल बियाण्याची मागणी आहे.

अकोला: येत्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी सर्व वाणांचे बियाणे मिळून ६४२३१ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. बीटी कापसाच्या ७.२० लाख पाकिटांसह ८४९९० मे. टन रासायनिक खतांच्या मागणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यापैकी महाबीजकडे ३६५०३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली जाणार आहे.खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांच्या मागणीचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या पीक पेऱ्यानुसार पेरणी झालेले क्षेत्र, त्यासाठी लागणाऱ्या बियाणे, खतांची मागणी कंपन्या, महामंडळ, शासनाकडे करण्यात आली आहे.खरीप ज्वारीच्या पेºयात वाढ गृहीत धरून येत्या वर्षासाठी १६८८ क्विंटल ज्वारी बियाण्याची मागणी होणार आहे. त्यापैकी महाबीजकडे १२०० क्विंटल बियाण्याची मागणी आहे. बीटी कापूस पेरणीसाठी विविध कंपन्यांकडून ७ लाख २० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये बीजी-१, बीजी-२ प्रकारातील बियाण्यांचा समावेश आहे. सोयाबीनचे ४९५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. त्यापैकी ३० हजार क्विंटल बियाणे महाबीजकडून मिळणार आहे. तुरीचे ३९३५ क्विंटल बियाणे मागविण्यात आले. मूग बियाण्याची २४४५ क्विंटल मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही मागणी घटली आहे. शेतकऱ्यांकडे गतवर्षीचे शिल्लक बियाणे वापराच्या दरानुसार घट किंवा वाढ ठरविली जाते. त्यानुसार उडिदाचे बियाणे १९६६ क्विंटल लागणार आहे. त्यामध्येही घट झाली असून, गेल्यावर्षी ती मागणी २५०७ क्विंटल होती. बाजरी- ५ क्विंटल, मका-७५ क्विंटल, सूर्यफूल-३ क्विंटल, तीळ-१४ क्विंटल, संकरित कपाशी- ४ हजार क्विंटल, सुधारित कपाशी-६०० क्विंटलची मागणी करण्यात आली आहे.

 जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीकृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया प्रमाणात बियाण्यांची मागणी करण्यात आली. महिन्यानुसार खतांची मागणीखरीप हंगामाच्या पेरणीपासून त्यापुढे लागणाºया महिनानिहाय वापरासाठी खतांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये एप्रिल-१०१९७ मे. टन, मे-११८९९, जून-१८६९८, जुलै-१७८४८, आॅगस्ट- १६१४९, सप्टेंबर-१०१९९ मे. टन मिळून ८४९९० मे. टन खतांची मागणी आहे.

खतांच्या प्रकारानुसार नियोजन (मे. टन)प्रकार                  मागणीयुरिया                 २४१९०डीएपी                 १४७५०एमओपी               ४६९०एसएसपी           १७०१९एनपीके              २४३४१

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती