भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:32+5:302021-05-05T04:30:32+5:30
तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील विजयाबद्दल ना.भुजबळ यांनी अभिनंदन केले असून, त्यांचा झाशीची राणी म्हणून ...

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील विजयाबद्दल ना.भुजबळ यांनी अभिनंदन केले असून, त्यांचा झाशीची राणी म्हणून उल्लेख केला. यामुळे चंद्रकांत पाटील यांचा पोटसूळ उठला, त्यांनी ‘छगन भुजबळ साहेब यांना तुम्ही जामिनावर सुटलेले आहात, फार महागात पडेल,’ अशी धमकीची भाषा वापरली. त्यांची दादागिरीची भाषा सहन केली जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याचा ओबीसी बांधवांच्या वतीने निषेध केला असून, प्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मंगळवारी, मूर्तिजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलने केली आहे. निवेदन ओबीसी सेल शहराध्यक्ष विशाल शिरभाते यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी ओबीसी सेल अकोला जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, ओबीसी सेल जिल्हा महासचिव किशोर सोनोने, ओबीसी सेल मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, ओबीसी सेल मूर्तिजापूर, ओबीसी सेल कार्याध्यक्ष अंकुश सुखसोहळे, सुमित सोनोने, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष अतुल गावंडे आदी उपस्थित होते.