राष्ट्रवादीने केला प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST2021-09-15T04:23:32+5:302021-09-15T04:23:32+5:30

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत खालच्या दर्जाची टीका केली होती. दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...

NCP protested against Praveen Darekar's statement | राष्ट्रवादीने केला प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादीने केला प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत खालच्या दर्जाची टीका केली होती. दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महानगराध्यक्षा रिज़वाना शेख अजी़ज़ यांच्या नेतृत्वात नवीन बसस्थानकासमोरच्या मदनलाल धिंग्रा चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रदेश प्रवक्त्या डॉ.आशाताई मिरगे, महानगर जिल्हा उपाध्यक्षा मंदा देशमुख,महिला उपाध्यक्षा दीपा शेगोकार,महासचिव रूपाली जामने, वीजेएनटी महिला अध्यक्ष माधुरी गिरी, असंघटित कामगार सेल महिला अध्यक्ष अनिता दिघेकर,युवती अध्यक्षा मेघा बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सुषमा राठोड, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा पिसे पाटील, माजी महानगर अध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, प्रदेश सदस्य विजय उजवणे, राष्ट्रीय महासचिव अल्पसंख्यक विभाग जावेद जकरिया, समीर खान,अजीज शेख सिकंदर,शेख चाँद,अबरार खान उपस्थित होते.

Web Title: NCP protested against Praveen Darekar's statement