शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Amol Mitkari: अकोल्यातून 'लोकसभा' लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही; अमोल मिटकरींचा इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:59 IST

amol mitkari news: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. 

अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने राज्य सरकार आणि भाजप व शिवसेनेवर टीका करत असतात. कधी पत्रकारांना दिलेल्या उत्तरातून तर कधी सोशल मीडियातून ते शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सरकारच्या कामाचं ते आवर्जून कौतुक करत होते. आता त्यांनी एक ट्विट करून आगामी लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार असल्याचा निर्धार मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे आहेत. अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला चोपायची ही संधी मी सोडणार नसल्याचे मिटकरींनी सांगितले. याशिवाय यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मिटकरींनी स्पष्ट केले.

लोकसभा लढवण्याचा मिटकरींचा निर्धार अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही." 

अमोल मिटकरी यांनी या आधी केलेल्या ट्विटमधून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली होती. आशिष शेलार यांचा धनुष्यबाणासोबतचा फोटो ट्विट करून मिटकरींनी भाजपाची खिल्ली उडवली होती. "यालाच म्हणतात 'बाण' नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा.. (फक्त चंद्रा ऐवजी कमळा असे गुणगुणावे)", अशा शब्दांत त्यांनी शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAkolaअकोलाSharad Pawarशरद पवार