दाेन हजाराच्या नाेटेची राष्ट्रवादीने काढली अंतिम यात्रा; गांधी चाैकात केले आंदोलन

By राजेश शेगोकार | Updated: May 24, 2023 16:15 IST2023-05-24T16:15:00+5:302023-05-24T16:15:09+5:30

केंद्र सरकाराच्या धाेरणाविराेधा नारेबाजी 

NCP made Agitation against 1 thousand note banned | दाेन हजाराच्या नाेटेची राष्ट्रवादीने काढली अंतिम यात्रा; गांधी चाैकात केले आंदोलन

दाेन हजाराच्या नाेटेची राष्ट्रवादीने काढली अंतिम यात्रा; गांधी चाैकात केले आंदोलन

अकाेला :  केंद्र सरकारने दाेन हजाराची नाेट चलनातुन काढण्याचा निर्णय घेतला हा निर्णय केंद्राच्या आर्थिक धाेरणाची धरसाेडवृत्ती दर्शविणारा असून नागरिकांना त्रास देण्याचा शासनाची भूमिका आहे असा आराेप करत अकाेला जिल्हा राष्टवादी काॅंग्रेसने दाेन हजाराच्या नाेटीची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध केला. 

स्थानिक स्वराज्य भवन येथून अंतयात्रेला प्रारंभ झाला. यात्रा मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), गांधी राेड, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, महापािलकासमाेरून काढत गांधी चाैकात समाराेप झाला. गांधी चाैकात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे , माजी आमदार तुकाराम बिरकड, डाॅ.आशा मिरगे, आनंद वानखडे, विजय उजवणे, करण दाेड आदींनी केंद्र सरकारच्या विराेधात नारेबाजी केली. या अंतयात्रेत अनेक पदाधिकाऱ्यांनी केद्र सरकारच्या विराेधातील घाेषणांचे फलक हाती घेतले हाेते.

Web Title: NCP made Agitation against 1 thousand note banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.