शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘एनसीडी’अंतर्गत ३४ हजारांवर रुग्णांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 11:53 IST

एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जिल्ह्यात एनसीडी केंद्रांतर्गत ३४ हजार ३४३ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

अकोला : असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यात एनसीडी केंद्रांतर्गत ३४ हजार ३४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले.बदलती जीवनशैली अन् वाढत्या तणावामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांच्या यादीत कर्करोगापाठोपाठ रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष विषाणूजन्य आजारांपेक्षा जास्त उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांत लक्षणीय वाढ होत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जिल्ह्यात एनसीडी केंद्रांतर्गत ३४ हजार ३४३ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार ५५५ रुग्ण उच्च रक्तदाबाचे, तर ३ हजार ८४५ रुग्ण मधुमेहाचे असल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांचे निदान झाले; पण या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे प्रकाशित ‘नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९’मध्येही देशभरात उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले होते.असे आहे रुग्णांचे प्रमाणआजार - पुरुष रुग्ण - महिला - रुग्णांची संख्यामधुमेह - १,९९७ - १८४८ - ३,८४५उच्च रक्तदाब - २३०६ - २२४८ - ४,५५५कर्करोग - ३ - ९ - १२हृदयविकार - ७ - ५ -१२स्ट्रोक - ०० - ०० - ००महिलांच्या तुलनेत पुरुषांची रुग्णसंख्या जास्तसाधारणत: मधुमेह रुग्णांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त असते; मात्र जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे. अहवालानुसार, १ हजार ९९७ पुरुष रुग्ण, तर १ हजार ८४८ रुग्ण महिला असल्याचे समोर आले आहे. शिवाय, उच्च रक्तदाबाचे २ हजार ३०६ पुरुष रुग्ण, तर २ हजार २४८ महिला रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. निदानासाठी एनसीडी केंद्र कार्यरत आहेत. याच माध्यमातून अशा रुग्णांचे निदान करणे शक्य झाले. नागरिकांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य