संसदेत गाजला अकोल्यातील नईम फराजचा शेर!
By Admin | Updated: March 30, 2017 02:55 IST2017-03-30T02:55:16+5:302017-03-30T02:55:16+5:30
विदर्भातील काँग्रेस युवा खासदार राजीव सातव यांनी अकोल्यातील शायर नईम फराज यांचा शेर सादर केला.

संसदेत गाजला अकोल्यातील नईम फराजचा शेर!
अकोला, दि. २९- आगामी १ जुलैपासून लागू होत असलेल्या जीएसटीचे विद्येयक संमत करण्यासाठी आज लोकसभेच्या संसदेत ठेवण्यात आले. जमीन घरभाड्याच्या अन्यायकारक मुद्याला काँग्रेसने कडाडून विरोध केला. विदर्भातील काँग्रेस युवा खासदार राजीव सातव यांनी विरोध करताना भाषणाच्या शेवटी जो शेर सादर केला, तो शेर अकोल्यातील शायर नईम फराज यांचा आहे.
त्यामुळे बुधवारच्या या ह्यजीएसटीह्णवरील संभाषणाची चित्रफीत व्हाट्सअँप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाली. गुनगान जीन उजालो का तुम कर रहे हो आज. ये सब चिराग हमने ही रोशन कीये थे कल.. या शेरने सातव यांनी चर्चेला पूर्णविराम दिले. अकोल्यातील एका युवा शायरला थेट दिल्लीच्या संसदेत न्याय मिळावा, एवढे दज्रेदार शायर अकोल्यात असल्याचा सार्थ अभिमान बुधवारी अनेकांनी बोलून दाखविला.