तुकडोजी महाराजांनी घटस्थापना केलेलं आकोटचं नवदुर्गा मंदीर
By Admin | Updated: October 3, 2016 13:03 IST2016-10-03T11:37:46+5:302016-10-03T13:03:44+5:30
आकोट येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घटस्थापना केलेलं 65 वर्षापुर्वीत नवदूर्गा मंदिर आहे

तुकडोजी महाराजांनी घटस्थापना केलेलं आकोटचं नवदुर्गा मंदीर
>विजय शिंदे / ऑनलाइन लोकमत
आकोट(जि. अकोला), दि. 3 - आकोट येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घटस्थापना केलेलं 65 वर्षापुर्वीत नवदूर्गा मंदिर आहे. आकोटात माता मैदानावर श्री. दुर्गामाता मंदीर संस्थान आहे. या मंदीरात देवीच्या दोन मुर्ती आहेत. एक मुर्ती संगमरवराची असून ती जयपूरवहून आणून मंदिरात स्थापीत केली आहे. तेव्हापासून हा नवदुर्गा उत्सव सुरू आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर हे रंगीत काचेने रेखीव केले आहे. दररोज या मंदिरात पूजा आरती होते. मंदिरात गणपती व भैरवनाथाचीही मूर्ती आहे. नवदूर्गा उत्सव दरम्यान दररोज भाविकाची प्रचंड गर्दी असते.दररोज अन्नदान सुरू असते अशी माहीती संस्थानचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी दिली