निसर्गपर गीत-संगीताची बहार

By Admin | Updated: August 4, 2014 20:27 IST2014-08-04T00:56:36+5:302014-08-04T20:27:44+5:30

अकोला वर्षा महोत्सवात शनिवारी निसर्गपर गीत-संगीताची मेजवानी रसिकांना अनुभवण्यास मिळाली.

Nature song | निसर्गपर गीत-संगीताची बहार

निसर्गपर गीत-संगीताची बहार

अकोला : पर्यावरण शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन व बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने अकोला वर्षा महोत्सवात शनिवारी निसर्गपर गीत-संगीताची मेजवानी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. अकोला जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी निसर्गपर गीत आणि नृत्याचे सादरीकरण रसिकांची मने जिंकली.
झाडोरा एक निसर्ग चळवळ अंतर्गत दरवर्षी अकोला वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा १५ व्या वर्षी हा महोत्सव आयोजित केला गेला. प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री सुधाकर गणगणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष गुलाब हुसेन गुलाब देशमुख, माजी आमदार नारायण गव्हाणकर, वनराईचे माजी अध्यक्ष महेंद्रसिंग सलुजा, जि.प. सदस्य रवींद्र गोपकर, मनोहर रिधुरकर आदी उपस्थित होते. महोत्सवात एज्युविला स्कूल पातूर, सन्मित्र पब्लिक स्कूल, मनुताई कन्या शाळा, कोठारी कॉन्व्हेंट, जि.प. शाळा भौरद, शिवाजी महाविद्यालय व लरातो वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. रहीम शेख यांच्या नवरंग ग्रुपच्यावतीनेदेखील यावेळी विविध नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. पुण्याच्या दुर्गा गवई या विद्यार्थिनीनेदेखील लक्ष वेधून घेतले.
पाहुण्यांचे स्वागत गजानन पाटील व अविनाश इंगळे यांनी केले. कार्यक्रमात संगीत साथ दिली ती सिंथेसायझरवर सुरेंद्र निंबाळकर, आक्टोपॅडवर प्रमोद जमदाडे व ढोलकवर राजेश बनकर यांनी. गायन विजय इंगोले, प्रवीण मोहोड व बाळू गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माला बागडे यांनी, तर आभार संयोजक रुपसिंग बागडे यांनी मानले.

Web Title: Nature song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.