पीककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

By Admin | Updated: July 17, 2014 01:15 IST2014-07-17T01:03:46+5:302014-07-17T01:15:03+5:30

अकोला जिल्हा बँकेने घेतली आघाडी : १६ हजार ६७६ शेतकर्‍यांना कर्ज रुपांतरणाचा लाभ, उद्दिष्ट पूर्ण.

Nationalized banks trailing back in peak tax | पीककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

पीककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

संतोष मुंढे/ वाशिम
शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करण्यात राष्ट्रीयीकृत व ग्रामीण व खासगी बँकांचा हात आखडताच असल्याची बाब ३0 जूनअखेर शेतकर्‍यांना झालेल्या कर्ज वाटपाच्या आकडेवारीवरुन समोर आली आहे.
जिल्ह्यात जवळपास बारा राष्ट्रीयीकृत, तीन खासगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून २0१४ -१५ च्या खरीप हंगामासाठी ६१ हजार ५४४ शेतकरी खातेदारांना खरिपासाठी तर १0 हजार ८६१ खातेदारांना रब्बी पिकासाठी ७२४ कोटी ५ लाख रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ४५९ कोटी ३९ लाख रुपयांचे उद्दिष्ट विविध बँकांनी ३0 जून २0१४ अखेर पूर्ण केले आहे. ही आकडेवारी कर्जवाटपाचे ६३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दर्शविते. जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करण्यात हात आखडण्याचीच भूमिका राहिली असल्याचे ३0 जूनअखेर पूर्ण केलेल्या कृषी कर्ज पुरवठय़ाची आकडेवारी सांगते. जूनअखेर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १२ खासगी बँकांच्या विधी शाखांनी केवळ ३३ टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यापेक्षा थोडी बरी अवस्था ग्रामीण बँकेची असली तरी त्यांना दिलेली उद्दिष्टपूर्ती ३९ टक्क्यांच्या पुढे सरकली नाही. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेच काय ती जूनअखेर शेतकर्‍यांना कर्ज पुरवठय़ाच्या पुढे जावून कामगिरी बजावल्याचे आकडेवारी सांगते. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला २0१४-१५ साठी २९५ कोटी ७0 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जूनअखेर तब्बल ३१६ कोटी ८९ लाख ५0 हजार रुपयांचे कर्ज वाटप करून १0७ टक्के उद्दिष्टाची पूर्तता केली आहे. या संपूर्ण प्रकरणाला जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याची माहिती असून जिल्हाधिकार्‍यांनी यांसंदर्भात राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांन निदान दिलेले उद्दीष्ट तरी पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार बैठका घेण्यासह वरिष्ठ स्तरावर याप्रकरणी माहिती पाठविण्याचे काम केल्याची माहिती आहे.

Web Title: Nationalized banks trailing back in peak tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.