राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST2021-09-19T04:20:08+5:302021-09-19T04:20:08+5:30

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजाबराव गुडदे हे होते, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माना पोस्टे ठाणेदार कैलास भगत, विद्यालयाचे ...

National Tobacco Control Program | राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजाबराव गुडदे हे होते, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माना पोस्टे ठाणेदार कैलास भगत, विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन गिरी, शिक्षक नागसेन गेडाम, सतीश गोकने, संजय अंभोरे, विनोद देशमुख, संजय भेंडकर, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया वाहणे, द्वितीय प्रणिता अवझाडे, तृतीय श्रुतिका गुडदे, चतुर्थ अनिकेत खंडारे व पाचवा अपर्णा चक्रे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रोत्साहनपर प्रमाणपत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक गजानन गिरी यांनी केले. संचालन करून आभार खंडेराव पांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिपाई विनोद देशमुख यांनी परिश्रम घेतले.

180921\img_20210918_174944.jpg

निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वाटप करतांना ठाणेदार कैलास भगत

Web Title: National Tobacco Control Program